आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिव पूजेचा सोपा विधी:श्रावण 27 ऑगस्टपर्यंत, फक्त जल-दूधच नाही तर या 5 गोष्टींनीही शिवलिंगाला अभिषेक करू शकता

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 29 जुलैपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. हा महिना 27 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. असे मानले जाते की, या महिन्यात केलेली शिव पूजा भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. शिवपूजेत शिवलिंगाला जल आणि दुधाचा विशेष अभिषेक केला जातो.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्या मते, महादेवाची पूजा करण्यापूर्वी भक्ताने कपाळावर चंदन किंवा भस्माचा त्रिपुंड लावावा. पूजा करण्यापूर्वी शिवलिंगावर असलेल्या वस्तू काढून टाकाव्यात. बेलाची पाने धुऊन पूजेत वापरता येतात. महादेवाची पूजा रात्रीही केली जाऊ शकते. जाणून घ्या महादेवाला वेगवेगळ्या वस्तूंनी अभिषेक केल्याने कोणत्या इच्छा पूर्ण होऊ शकतात.

  • महादेवाला दुधाच्या धाराने अभिषेक केल्यास घरात सुख-शांती नांदते. मन शांत राहते आणि कुंडलीतील चंद्र ग्रहाचे दोषही शांत होतात.
  • जल धारेने अभिषेक केल्यास भक्ताच्या सर्व अडचणी दूर होतात.
  • रोगांपासून मुक्ती मिळवायची असेल तर महादेवाला तूप आणि मधाने अभिषेक करावा. अत्तराचा अभिषेक केल्याने भक्ताला सुख-शांती मिळते. उसाच्या रसाने अभिषेक केल्याने जीवनात आनंद राहतो.
  • जे लोक महादेवाची निःस्वार्थ भक्ती करू इच्छितात त्यांनी शिवलिंगाला गंगाजलाने अभिषेक करावा. गंगाजल हे भगवान महादेवाला खूप प्रिय आहे आणि याच्या अभिषेकाने महादेव भक्तांना विशेष कृपा प्रदान करतात.

अशा प्रकारे तुम्ही महादेवाची पूजा करू शकता
शिवलिंगावर जल, पंचामृत आणि दूध अर्पण करावे. बेलाची पाने, धोत्रा, रुईची फुले, जानवे अर्पण करावे. चंदनाचा टिळा लावावा. मिठाईचा नैवेद्य दाखवावा. धूप आणि दिवे लावून आरती करावी. शेवटी महादेवाचे ध्यान करत शिवलिंगाची अर्धी प्रदक्षिणा करावी. पूजेत झालेल्या, चुकांसाठी परमेश्वराची क्षमा मागावी. पूजेनंतर प्रसाद वाटून स्वतः घ्यावा. पूजा करताना ऊँ नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहावे.

बातम्या आणखी आहेत...