आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जीवन सूत्र:श्रीकृष्ण आणि अर्जुन संवाद, धर्म केवळ कर्मकांड, पूजा-पाठ, तीर्थ मंदिरांपर्यंतच सीमित नसून, कर्तव्य हासुद्धा धर्मच आहे

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गीता एक प्रेरणादायी ग्रंथ असून माणसाला कल्याण मार्गाकडे नेणारा आहे

महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनाने शस्त्र खाली ठेवले होते, कारण अर्जुनाला कुटुंबातील सदस्याविरुद्ध युद्ध करावयाचे नव्हते. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता उपदेश केला होता. श्रीकृष्णाने गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 48 व्या श्लोकामध्ये सांगिलते आहे की, आपले कर्त्यवच धर्म आहे.

श्लोक
योगस्थ: कुरु कर्माणि संग त्यक्तवा धनंजय।
सिद्धय-सिद्धयो: समो भूत्वा समत्वं योग उच्यते।।

अर्थ - हे धनंजय (अर्जुन), कर्म न करण्याच्या आग्रहाचा त्याग करून, यश-अपयशाच्या विषयी समबुद्धी, योगयुक्त होऊन कर्म कर, कारण समत्वालाच योग म्हणतात.

मॅनेजमेंट सूत्र - धर्माचा अर्थ आहे कर्तव्य. धर्माच्या नावावर आपण अनेकवेळा केवळ कर्मकांड, पूजापाठ, तीर्थ-मंदिरपर्यंत सीमित राहतो. आपल्या ग्रंथांनी कर्तव्यालाच धर्म मानले आहे. भगवान सांगतात की, आपले कर्तव्य पूर्ण करताना कधीकधी यश-अपयश आणि नुसकान-फायद्याचा विचार करू नये. बुद्धी केवळ आपले कर्तव्य म्हणजे धर्मासाठी वापरून काम करावे.