आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्राचे राशी परिवर्तन:बुध सोबत असल्याने तयार होईल लक्ष्मी नारायण योग, देशाची आर्थिक स्थिती सुधारेल

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्र ग्रह शनिवारी स्वतःच्या राशीत म्हणजेच वृषभ राशीत आला आहे. 13 जुलैपर्यंत हा ग्रह या राशीत राहील. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा सुख-समृद्धी, भोग-विलास, दु:ख आणि खर्चाचा ग्रह मानला जातो. दुसरीकडे, बुध हा गणित, कायदा, संवाद, वाणिज्य, त्वचा, औषध, लेखन, तर्कशास्त्र इत्यादींचा कारक ग्रह मानला जातो.

बुधाची सूर्य आणि शुक्र यांच्यासोबत मैत्री आहे. सूर्य ग्रहाने 15 जून रोजीच मिथुन राशीत प्रवेश केला आहे. जी बुधाची राशी आहे. त्याचबरोबर शुक्र सध्या वृषभ राशीत आहे. अशा स्थितीत बुध आणि शुक्राच्या संयोगामुळे शेअर बाजार आणि इतर व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी चांगले परिणाम मिळू शकतात. बुध हा वाणीचा करक ग्रह देखील मानला जातो.

शुक्र आणि बुध आर्थिक बदल घडवून आणतात
ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र हा विलासी जीवन आणि मनोरंजनाचा कारक मानला जातो. पुरीचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्र सांगतात की, जेव्हा शुक्र राशी बदलतो तेव्हा देशात मोठे आर्थिक बदल होत असतात. आता होत असलेल्या शुक्राच्या राशी बदलामुळे व्यापार, सामाजिक दृष्टिकोन इ. मध्ये वृद्धी होईल.

शुक्र आणि बुध एकत्र आल्यास लक्ष्मी नारायण योगही तयार होतो. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. ज्या कुंडलीत असा योग तयार होतो. ती व्यक्ती अचानक श्रीमंत होते. अशा व्यक्तींना त्यांच्या प्रतिभा, कला आणि ज्ञानाने संपत्ती आणि सन्मान प्राप्त होतो. लक्ष्मी नारायण योगामुळे व्यक्तीच्या धनात वाढ होते.

कामात गती येण्याचे योग
डॉ. मिश्र यांच्यानुसार, शुक्राच्या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. यामुळे अनेकांचे उत्पन्न वाढू शकते. पैशाची आवक वाढेल. व्यवसायात सुधारणा होईल. कामात गती येईल आणि बुद्धिमत्तेमुळे लोकांना फायदाही होईल.

राजकारणात हुशार लोकांचे वर्चस्व वाढेल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना फायदा होऊ शकतो. संयम वाढेल. रोजगाराच्या संधी वाढतील. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात व्यस्त होऊ लागेल. व्यवसायावर बुध ग्रहाचा सर्वाधिक प्रभाव आहे. शुक्रासोबत बुधाची साथ असल्याने व्यवसायातील मंदी दूर होईल. फायदे वाढू लागतात. व्यवसायाचे कर्ज संपून प्रगती सुरू होईल.

बातम्या आणखी आहेत...