आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज सूर्यग्रहण:हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे इथे सुतक राहणार नाही, शनिश्चरी अमावस्येला करा तीळ आणि जल दान

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय वेळेनुसार शनिवारी, 30 एप्रिलच्या रात्री सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. यामुळे भारतात या ग्रहणाचे सुतक नसेल. शनिश्चरी अमावस्येशी संबंधित शुभ कार्य दिवसभर करता येईल.

शनिवारी चैत्र महिन्यातील अमावस्या आहे. शनिवारी अमावस्या असल्याने तिला शनिश्चरी अमावस्या म्हणतात. या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान करण्याची परंपरा आहे. जर तुम्हाला नदीत स्नान करणे शक्य नसेल, तर तुम्ही तीर्थक्षेत्रे आणि नद्यांचे ध्यान करताना घरीच स्नान करू शकता. पाण्यात थोडे गंगेचे पाणी मिसळा आणि त्या पाण्याने स्नान करा. असे केल्याने तीर्थयात्रेसारखे पुण्यही मिळू शकते.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, 30 एप्रिल ते 1 मे दरम्यान रात्री सूर्यग्रहण होत आहे. हे ग्रहण दक्षिण अमेरिका, दक्षिण पॅसिफिक महासागर इत्यादी ठिकाणी दिसेल. या देशांमध्ये ग्रहणाच्या वेळी दिवस असेल आणि सूर्यग्रहण सहज पाहता येईल.

ही आहे सूर्यग्रहणाची वेळ
भारतीय वेळेनुसार, सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी दुपारी 12.15 वाजता सुरू होईल आणि 1 मे रोजी पहाटे 4.08 वाजता समाप्त होईल. ज्या भागात ग्रहण दिसणार आहे, तेथे सुतक ग्रहणाच्या वेळेच्या 12 तास आधी सुरू होते आणि ग्रहण समाप्त होताच सुतकही संपते.

जाणून घ्या, शनिश्चरी अमावस्येला कोण-कोणते शुभ कार्य केले जाऊ शकते...

  • पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान आणि दर्शन घेण्यास शनिश्चरी अमावस्येला विशेष महत्त्व आहे. शनिवारी अमावस्या असल्याने या तिथीचे महत्त्व वाढते. या दिवशी शनिदेवाला काळे तीळ दान करावेत.
  • सध्या उन्हाळा सुरू आहे, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पाणपोई लावावीत किंवा थंड पाण्यासाठी माठ दान करावेत.
  • पितृ हा या तिथीचा स्वामी आहे. या दिवशी पितरांसाठी श्राद्ध, तर्पण इत्यादी शुभ कार्य करावे. या दिवशी पितरांची नावे घेऊन पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पितरांना जल अर्पण करावे.
  • पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्नाची व्यवस्था करावी. गाय, कुत्र्यासाठी भाकरी टाकावी. पिठाचे गोळे बनवून तलावातील माशांना खाऊ घाला. मुंग्यांना पीठ टाकावे. हे छोटे शुभ कार्य अक्षय पुण्य देणारे आहेत.
बातम्या आणखी आहेत...