आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवीच्या उपासनेचे विशेष दिवस:केवळ अष्टमी आणि नवमीला उपवास केल्याने मिळेल संपूर्ण नवरात्रीमध्ये शक्तीची उपासना केल्याचे फळ

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

26 सप्टेंबरपासून सुरू झालेली नवरात्री 4 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या दिवसात देवीची सर्व प्रकारे पूजा केली जाते. या विशेष उपासनेमध्ये विशेष गोष्टींच्या मदतीने उपवास, यज्ञ आणि तपश्चर्या केली जाते. त्यापैकी अष्टमी आणि नवमीला देवीची विशेष पूजा करण्याचा नियम आहे. ज्यांना संपूर्ण नवरात्रीत देवीची पूजा करता आली नाही त्यांच्यासाठी हे दोन दिवस खूप खास आहेत.

पुरीचे ज्योतिषाचार्य आणि धार्मिक ग्रंथांचे तज्ज्ञ डॉ. गणेश मिश्र सांगतात की, जर तुम्हाला नवरात्रीत दररोज उपवास ठेवता येत नसेल, तर केवळ अष्टमी आणि नवमीला उपवास केल्यास संपूर्ण शक्ती उत्सवाचे फळ मिळू शकते.

अष्टमी आणि नवमीला व्रत-उपवास करावा
नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा विधीपूर्वक केली जाते. या दिवसात काहीही न खाता देवीची पूजा करावी असे मार्कंडेय पुराणात म्हटले आहे. तथापि, बऱ्याच लोकांना तसे करणे शक्य होत नाही. त्यामुळे केवळ अष्टमी किंवा नवमीलाच असे कठीण तप आणि उपासना केली जाऊ शकते. असे केल्याने संपूर्ण नवरात्रीच्या पूजेचे विशेष फळ मिळू शकते.

काही लोक दोन्ही दिवशीही उपवास करतात. अष्टमी आणि नवमीला उपवास केल्याने शरीर आणि मन शुद्ध होतेच पण देवीच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात.

देवांनीही केली होती देवीची पूजा
मार्कंडेय पुराणानुसार देवतांनीही नऊ दिवस देवीची आराधना केली होती. देवराज इंद्राने वृत्रासुर राक्षसाचा वध करण्यासाठी देवी दुर्गेची विशेष पूजा केली. एवढेच नाही तर त्रिपासुर राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान महादेवाने भगवतीची पूजा केली. जगाचे स्वामी भगवान विष्णू यांनी मधु-कैटभ नावाच्या दोन्ही राक्षसांचा वध करण्यासाठी देवी दुर्गेची पूजा केली.

वाल्मिकी रामायणातही शक्तीपूजेचा उल्लेख आहे. रावणाला मारण्यापूर्वी श्रीरामाने देवीची पूजा केली. देवीच्या आशीर्वादाने, भगवान श्रीरामाला अमोघ बाण मिळाला होता, ज्यामुळे ते रावणाचा वध करू शकले. पांडवांनीही आपली शक्ती वाढवण्यासाठी, धर्माद्वारे विजय मिळवण्यासाठी देवीची उपासना केली होती.

या तीन दिवसात लक्षात ठेवा या गोष्टी
1.
अष्टमी, नवमी आणि दसऱ्याला तामसिक अन्न खाऊ नये. म्हणजेच लसूण, कांदा, मांस यांसह थंड-शिळे आणि कोणतेही दूषित अन्न खाऊ नका.

2. या तीन दिवसात धान्य खाऊ नये. त्यापेक्षा फलाहार घ्यावा.

3. पुराणानुसार उपवासात दिवसा झोपू नये. असे केल्याने उपवास तुटतो, म्हणजे मोडतो.

4. या दिवसात दारू, तंबाखू आणि सर्व प्रकारच्या मादक पदार्थांपासून दूर राहावे.

5. नवरात्रीच्या या तीन दिवसांमध्ये पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवणेही टाळावे.

बातम्या आणखी आहेत...