आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांततेचे सूत्र:चुकीला बरोबर सिद्ध करण्याऐवजी ती कबूल करा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चुकीला बरोबर सिद्ध करण्याऐवजी ती कबूल करा. तिचे औचित्य सिद्ध करणे फार वरवरचे आहे, कारण त्यामुळे दोषभावना कमी होत नाही. आपल्या अपराधी भावनेसोबत १०० टक्के राहा, तेव्हा ती ध्यानासारखी होईल आणि तुमची ती भावनाही जाईल.

चूक करणाऱ्या एखाद्याशी आपण कसे वागतो? त्याला त्याच्या चुकीबद्दल सांगू नका, कारण ती त्याला माहीत आहे. त्याला दोषी, बचावात्मक किंवा अपमानकारक वाटू देऊ नका. कारण त्यामुळे तो आपल्यापासून आणखी दूर जाईल. केवळ अशाच व्यक्तीला त्याच्या चुकीबद्दल सांगा, जो त्याबाबत अनभिज्ञ आहे आणि ती जाणून घेण्यास इच्छुक आहे. बहुतांश वेळा लोकांना आपण काय चूक केली हे माहीत असते, पण कुणी त्याकडे बोट दाखवू नये, असेही त्यांना वाटत असते.

इतरांच्या चुकांबाबतचा अभिप्राय पाहू नका. कुणी काही चुकीचे केल्यावर त्याने ते मुद्दाम केल्याचे आपल्याला वाटते. परंतु, विशाल दृष्टिकोनातून पाहिल्यावर लक्षात येते की, वस्तुतः गुन्हेगारच शिकार झालेला आहे. एक प्रबुद्ध व्यक्ती इतरांमध्ये केवळ चुकाच पाहत नाही, तर तो करुणेसह त्यांना त्या चुका सुधारण्यासाठी मदतही करते. परंतु, एखादा मूर्ख इतरांच्या चुकांमुळे खुश होतो आणि जगासमोर त्याबाबत गर्वाने जाहीरपणे सांगतो. बुद्धिमान व्यक्ती नेहमी इतरांची प्रशंसा करते. आत्म्याचे उत्थान करणे हाच विवेक आहे. आपण केंद्रित होतो तेव्हा नेहमी आपल्या चहुकडे सर्वांचे उत्थान करण्यासाठी तत्पर राहता. आपल्या मनाला जपा. मन स्थिर होते तेव्हा आपली इच्छा असूनही चूक करू शकत नाही. आत्मज्ञानाने भीती, राग, अपराधी भावना, नैराश्य अशा नकारात्मक भावना संपून जातात.

श्रीश्री रविशंकर आध्यात्मिक गुरू

बातम्या आणखी आहेत...