आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांततेचे सूत्र:गमावलेला आत्मसन्मान परत मिळवण्याचे काही मार्ग

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘द ब्लूएस्ट आय’ या कादंबरीत टोनी मॉरिसनने आपल्या रूपावर खुश नसलेल्या एका मुलीबद्दल लिहिले होते. तिला निळे डोळे हवे होते, पण तिचे डोळे काळे होते. सुखी कुटुंब मिळावे अशी तिची इच्छा होती, परंतु तिचे कुटुंब आनंदी नव्हते. तिच्या कुटुंबातील सदस्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे तिचा कमकुवत स्वाभिमान आणखी क्षीण झाला.

आपल्यापैकी काहींच्या वाट्याला घरी, शाळेत, साथीदार आणि कुटुंबीयांमध्ये असेच दुःखी क्षण आले असतील. आपण इतके चांगले नाहीत, या खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवला. आपल्यापैकी काहींनी चांगली सुरुवात केली असेल, परंतु नंतर आलेल्या अपयशांमुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला असेल. आताही आपल्यापैकी काहींच्या जीवनात सर्व काही आपल्या बाजूने घडत असेल, परंतु आपण स्वतःशी सतत नकारात्मक बोलणे हानिकारक ठरू शकते. कारण काहीही असो, पण काही उपायांनी आत्मसन्मानाचा अभाव दूर करता येतो.

पहिले म्हणजे प्रतिकूलता व लोकांना आपण बळी पडत आहोत, असा जितका विचार कराल तितके कमकुवत होत जाल. आपला भूतकाळ एक स्वप्न म्हणून पाहा आणि भविष्याचा मजबुतीने व निर्भयपणे सामना करा.

दुसरे म्हणजे तुमच्या मनावरील ओझे काढून टाका. स्वतःला कमकुवत लेखता तेव्हा अपयशाची उदाहरणे तुम्हाला हानिकारक भावनिक भार देतात. आत्मविश्वास वाढवण्यासाठी ते सोडणे चांगले. यासाठी ध्यानाची मदत घ्या. ध्यानाद्वारे स्वाभिमान वाढवणे हे वास्तव आहे. तुम्ही स्वतःशी सामान्य असता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो.

तिसरे म्हणजे नकारात्मक विचारांपासून दूर राहणे. आपल्या कमतरतेबद्दल दुःख करण्याऐवजी त्या सुधारण्याचा संकल्प करा. अंतर्गत नकारात्मक संवादात गुंतण्याऐवजी ते अदृश्य होईपर्यंत त्यांचे निरीक्षण करा.

चौथे म्हणजे इतरांशी स्पर्धा करण्याची प्रवृत्ती, ती टाळा. ही प्रवृत्ती आपल्याला ना उपयुक्त बनवते आणि ना आनंदी राहू देते. आपण स्वतःशी स्पर्धा केली तर आपण केवळ अधिक उपयुक्तच नाही, तर मजबूत आत्मसन्मानदेखील प्राप्त करतो.

श्रीश्री रविशंकर
आध्यात्मिक गुरू

बातम्या आणखी आहेत...