आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 सप्टेंबरला वामन जन्मोत्सव:वामन देवांनी अवघ्या तीन पावलांमध्ये व्यापून टाकले ब्रह्मांड, पाताळलोकात पाठवले राजा बळीला

24 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

बुधवार, 7 सप्टेंबरला भाद्रपद शुक्ल द्वादशी आहे. या तिथीला वामन जयंती साजरी केली जाते. श्रीमद भागवत पुराणानुसार जेव्हा वामन देव अवतरले तेव्हा चंद्र श्रवण नक्षत्रात होता. त्यांचा जन्म दुपारी अभिजित मुहूर्तावर झाला. या द्वादशीला भगवान विष्णूंचा अवतार वामन देव यांची विशेष पूजा केली जाते.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्या मते वामन द्वादशीलाही उपवास केला जातो.जे लोक हे व्रत करतात त्यांनी दुपारी बाराच्या सुमारास भगवान वामनाची विधिवत पूजा करावी.

अशा प्रकारे तुम्ही वामन देवाची पूजा करू शकता

 • वामनदेवांना पंचामृताने अभिषेक करावा. पंचामृत बनवण्यासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखरेचा वापर केला जातो. पंचामृतानंतर पाण्याने अभिषेक करावा. देवाला वस्त्र अर्पण करावे. अत्तर लावावे. हार आणि फुलांनी शृंगार करावा.
 • धूप-दीप लावावा. भगवान वामन किंवा विष्णूच्या मंत्रांचा जप करावा. भगवान वामनाची कथा वाचा किंवा ऐका. मिठाईचा नैवेद्य दाखवावा.
 • एक मातीचा कलश दह्याने भरून घ्या. यासोबतच गरजू व्यक्तीला तांदूळ आणि साखर दान करा. तुम्ही या तीन गोष्टी एखाद्या मंदिरातही दान करू शकता.
 • व्रत करणाऱ्या व्यक्तीने फलाहार करावा. दुसऱ्या दिवशी म्हणजे त्रयोदशी तिथीला पुन्हा एकदा वामन देवाची पूजा करावी. पूजेनंतर एखाद्या गरजूला जेवण द्यावे आणि त्यानंतर स्वतः जेवण करावे.

वामन देवाची संक्षिप्त कथा

 • सत्ययुगात भक्त प्रल्हादचा नातू राजा बळी होऊन गेला. बळी राजाने स्वर्गाचा ताबा घेतला तेव्हा सर्व देवतांनी भगवान श्रीविष्णूकडे मदत मागितली.
 • भगवान विष्णूंनी सांगितले, मी स्वतः देवमाता अदितीच्या घरी जन्म घेईन आणि सर्व देवांचे दुःख दूर करेल. यानंतर श्रीविष्णूने वामनदेव रूपात जन्म घेतला.
 • राजा बळी नर्मदा नदीच्या काठी अश्वमेध यज्ञ करत होता. भगवान वामन त्या यज्ञात पोहोचले. बाल ब्रह्मचारी वामनाला पाहून राजा बळीने त्यांचे स्वागत केले आणि दान मागण्यास सांगितले.
 • भगवान वामन म्हणाले, मला फक्त तीन पग (पाऊले) भूमी हवी आहे. राजा बळीने विचार केला की मी तिन्ही जगाचा स्वामी आहे, मी सहज तीन पग जमीन देऊ शकतो.
 • दैत्य गुरु शुक्राचार्य त्यांना असे करू नको सांगत होते, परंतु राजा बळीने वामनाला तीन पाऊले जमीन देण्याचे वचन दिले.
 • भगवान वामनाने एका पावलात पृथ्वी आणि दुसऱ्या पावलात आकाश व्यापले. तेव्हा राजा बळी म्हणाला की, तुम्ही माझ्या मस्तकावर तिसरे पाऊल ठेवू शकता. वामनदेवाने बळीच्या मस्तकावर तिसरे पाऊल ठेवताच तो पाताळात गेला.
 • भगवान वामन त्याच्या दानावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला पाताळलोकाचा स्वामी बनवले.
बातम्या आणखी आहेत...