आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यदेवाचा मीन राशीत प्रवेश:सूर्यदेव राहणार देवगुरु बुहस्पतींच्या सेवेत

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार, 15 मार्च रोजी सूर्य ग्रहाचे राशी परिवर्तन होईल. सूर्यदेव मीन राशीमध्ये प्रवेश करतील आणि यामुळे 14 एप्रिलपर्यंत खरमास राहील. खरमासात सूर्य गुरु बृहस्पतींच्या सेवेत राहतो, यामुळे या महिन्यात शुभ कार्यांसाठी कोणतेही मुहूर्त नसतात.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं.मनीष शर्मा यांच्या मते खरमासात दान, तीर्थयात्रा, स्नान आणि जप करण्याची परंपरा आहे. 15 मार्चला मीन संक्रांत असल्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा करावी. सकाळी लवकर उठून स्नान करून तांब्याच्या भांड्यातून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. यासाठी तांदूळ आणि लाल फुले पाण्यासोबत भांड्यात टाकावीत.

जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांती किंवा ज्योतिषशास्त्रात संक्रमण म्हणतात. 15 मार्च रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा या दिवशी मीन संक्रांती साजरी केली जाईल. संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. स्नानानंतर दान करावे.

भगवान श्रीकृष्णानेही केली आहे सूर्य पूजा
सूर्य हा पाच देवांपैकी एक आहे. पंचदेवांमध्ये श्रीगणेश, शिव, विष्णू, देवी दुर्गा आणि सूर्यदेव यांचा समावेश होतो. भविष्य पुराणातील ब्रह्मपर्वात श्रीकृष्ण आणि सांब (श्री कृष्णाचा पुत्र) यांच्यातील संभाषण सांगितले आहे. या संदर्भात श्रीकृष्णाने सांबाला सूर्याची उपासना करण्याची प्रेरणा दिली. श्रीकृष्ण म्हणतात, जे सूर्याची उपासना करतात, त्यांना ज्ञान मिळते, मान मिळतो. मीही सूर्याची पूजा केली आहे.

खरमासात हे शुभ कार्य करू शकता

  • खरमासात गायींच्या संगोपनासाठी पैसे दान करावेत. गाईंना हिरवे गवत खायला द्यावे. गरजू लोकांना पैसे आणि धान्य दान करावे. उन्हाळा सुरू होणार आहे, अशा परिस्थितीत गरजू लोकांना बूट, चप्पल, छत्र्या दान करू शकता.
  • सूर्यदेवाला तांब्याचे भांडे, पिवळे किंवा लाल वस्त्र, गहू, गूळ, माणिक, लाल चंदन यांसारख्या वस्तू दान करा.
  • रोज सकाळी शिवलिंगाला जल अर्पण करावे. शिवलिंगाला बिल्वची पाने आणि फुलांनी सजवा. मंदिरात पूजा साहित्य दान करावे.
  • बजरंगबलीसमोर समोर धूप-दीप लावून हनुमान चालिसाचा पाठ करावा.
बातम्या आणखी आहेत...