आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सूर्यग्रहण:आज रात्री 10.14 पासून सुरु होईल सुतक काळ आणि रविवारी दुपारी ग्रहण समाप्तीपर्यंत राहील, 2020 नंतर 2139 मध्ये जुळून येईल 3 ग्रहणांचा योग

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या, ग्रहणाशी संबंधित काही खास गोष्टी...

रविवार 21 जून रोजी वर्षातील पहिले आणि शेवटचे सूर्यग्रहण होईल. हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसेल. सकाळी 10.14 पासून सूर्यग्रहण सुरु होईल. या काळात केवळ मंत्र जप करू शकता. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार ग्रहण सकाळी 10.14 पासून दुपारी 1.38 पर्यंत राहील. ग्रहणाचा सुतक काळ 12 तासांपूर्वी सुरु होतो आणि ग्रहण संपेपर्यंत राहतो. ग्रहण संपल्यानंतर पूज-पाठ केले जाऊ शकतात.

यापूर्वी 5 जूनला चंद्रग्रहण झाले होते, 21 जूनला सूर्यग्रहण होईल आणि 5 जुलैला पुन्हा चंद्रग्रहण होईल. 5 जून आणि जुलैच्या चंद्रग्रहणाचे धार्मिक महत्त्व नाही. कारण हे मांद्य चंद्रग्रहण आहेत. अशाप्रकारे 30 दिवसात तीन ग्रहणाचा दुर्लभ योग आता 119 वर्षांनंतर जुळून येईल. वर्ष 2139 मध्ये 11-12 जुलैच्या रात्री चंद्रग्रहण, 25-२६ जुलैला सूर्यग्रहण आणि त्यानंतर 9-10 ऑगस्ट दरम्यान रात्री चंद्रग्रहण होईल. त्यावेळीही चंद्रग्रहणाचे धार्मिक महत्त्व नसेल.

1962 मध्येही झाले होते असे 3 ग्रहण 

2020 पूर्वी शनि मकर राशीमध्ये वक्री असताना असेच तीन ग्रहण 1962 मध्ये झाले होते. 58 वर्षांपूर्वी 17 जुलैला चंद्रग्रहण, 31 जुलैला सूर्यग्रहण आणि 15-16 ऑगस्टला रात्री चंद्रग्रहण झाले होते. 1962 मध्ये भारत-चीन युद्ध झाले होते. काही दिवसांनंतर 1 सप्टेंबर 1962 मध्ये इराणमध्ये मोठा भूकंप झाला होता. 2020 मध्येही असेच तीन ग्रहण होत आहेत. मागील काही दिवसांपासून देशातील विविध भागात वारंवार भुकंपाचे हादरे बसत आहेत. हे ग्रहण भारताव्यतिरिक्त आशिया, आफ्रिका आणि युरोपच्या काही भागातही दिसेल. प्रत्येक ठिकाणी ग्रहणाची वेळ वेगवेगळी असेल.

ग्रहणाशी संबंधित काही खास गोष्टी...

- सुतक काळात पूजा-पाठ करू नये, मानसिक स्वरूपात मंत्र जप करू शकता. कुलदेवतेचेही स्मरण करू शकता.

- ग्रहण काळात गरोदर स्त्रियांनी घराबाहेर पडू नये. कारण या काळात सूर्यापासून हानिकारक तरंग निघतात, जे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

- अन्नपदार्थांवर तुळशीची पाने ठेवावीत, यामुळे अन्न ग्रहणामुळे अशुद्ध होणार नाही.

- ग्रहण संपल्यानंतर घराची स्वच्छता करावी.

- घरातील स्थापित देवतांची पूजा करावी. 

बातम्या आणखी आहेत...