आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यपूजा:ज्येष्ठ महिन्यातील रविवारी सूर्याच्या दिव्य स्वरूपाची उपासना केल्याने वाढते वय

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ महिन्यात भगवान सूर्य नारायणाची पूजा करण्याचे विधान आणि त्याचे महत्त्व सर्व धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे. या महिन्यात सूर्याच्या गाभस्तिक(सूर्यदेवाचे एक रूप) रूपाची पूजा केली जाते. ज्येष्ठ महिन्यातील रविवारी उगवत्या सूर्याला जल अर्पण केल्याने रोग दूर होतात आणि उपवास केल्याने वय वाढते, असे जाणकार सांगतात. तसेच या दिवशी जलदान केल्याने अनेक यज्ञ केल्याचे पुण्य मिळते.

सूर्यपूजा कशी करावी
ज्येष्ठ महिन्यात सूर्यपूजेला खूप महत्त्व आहे. या महिन्यातील रविवारी उगवत्या सूर्याला जल अर्पण करावे. यासाठी तांब्याच्या भांड्यात लाल चंदन, लाल फुले, तांदूळ आणि काही गव्हाचे दाणे ठेवा. ऊँ घृणि: सूर्याय नम: या मंत्राचा जप करत जल अर्पण करावे. त्यानंतर भगवान भास्कराला नमस्कार करावा. यानंतर सूर्याच्या 12 नामांचा जप करावा.

व्रताचे असे करावे पालन
पुरीचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्र यांच्यानुसार, सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतर श्रद्धेनुसार अन्न, वस्त्र किंवा कोणतीही उपयुक्त वस्तू गरजूंनाच दान करा. गाईची सेवा करा. जनावरांना पाणी द्या. छत्री आणि पादत्राणे दान करा.

ज्येष्ठ महिन्यातील रविवारी व्रत केल्यास रोगांपासून मुक्ती मिळते. या दिवशी उपवास करताना मीठ खाऊ नये. फक्त फळे खा. सूर्याच्या उपासनेमध्ये सूर्यदेवाचे ध्यान करावे. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणीच प्या. दुसऱ्या दिवशी सूर्योदय होईपर्यंत उपवास ठेवा.

ज्येष्ठ मासाचे महत्त्व
ज्येष्ठ हा हिंदू पंचांगातील तिसरा महिना आहे. हा महिना ज्येष्ठा नक्षत्राच्या नावावर आधारित आहे. तसे, फाल्गुन महिन्याच्या शेवटी उन्हाळ्याची सुरुवात होते. मात्र ज्येष्ठ महिना सुरू झाला की, उष्णता जास्त वाढते. म्हणून ग्रंथात ज्येष्ठ महिन्यातील पाण्याचे महत्त्व सांगितले आहे. त्यामुळेच या मराठी महिन्यात पाण्याशी संबंधित उपवास आणि व्रत साजरे केले जातात.

बातम्या आणखी आहेत...