आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यमुना नदी पूजेचा दिवस:चैत्र नवरात्रीच्या सहाव्या दिवशी साजरा केला जातो यमुना देवीचा प्रकटोत्सव, भाऊ यम आणि सूर्य देवाचीही केली जाते पूजा

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चैत्र नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी स्कंदमातेसोबत यमुना नदीचीही पूजा केली जाते. या दिवशी यमुना छठ साजरी केली जाते. ग्रंथानुसार, या तिथीला देवी यमुना हिमाचलच्या उत्तरकाशी जिल्ह्यात नदीच्या रूपात प्रकट झाली. आज त्यांची मूर्तीच्या रूपाने मंदिरात पूजा केली जाते. ज्याला यमुनोत्री धाम म्हणतात. हे उत्तराखंडमधील चार धामांपैकी एक आहे.

शास्त्रानुसार यमुना देवी भगवान सूर्य, शनिदेव आणि यमदेव यांची बहीण आहे. मथुरेतील लोक तिची श्रीकृष्णाची पत्नी म्हणून पूजा करतात. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सहाव्या तिथीला यमुना छठ उत्सव साजरा केला जातो. या दिवशी यमुना नदीची विशेष पूजा केली जाते.

यमुना स्नान करून सूर्य आणि यमदेवाची पूजा
या दिवशी यमुना नदीत स्नानासोबतच भाऊ सूर्य आणि यमदेव यांची पूजा करण्याचीही परंपरा आहे. चैत्र महिन्यातील छठला सूर्योदयापूर्वी यमुनेला नतमस्तक होऊन नदीत स्नान करावे. त्यानंतर उगवत्या सूर्याला नदीच्या पाण्यानेच अर्घ्य द्यावे. यानंतर यमदेवाची पूजा करावी.

संध्याकाळी घराबाहेर दक्षिण दिशेला पिठाचा चौमुख (चार वाती असलेला) लावून यमदेवाची पूजा करावी. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरीच स्नानाच्या पाण्यात नदीचे थोडेसे पाणी मिसळून स्नान करू शकता. असे केल्याने नदीत स्नान करण्याचे पुण्यही प्राप्त होते.

यमुना पूजा मंत्र
यमस्वसर्नमस्तेऽसु यमुने लोकपूजिते।
वरदा भव मे नित्यं सूर्यपुत्रि नमोऽस्तु ते॥

यमुना किंवा नदीच्या मूर्तीची पूजा करताना या मंत्राचा उच्चार करावा. पूजेमध्ये कुंकू-हळद, चंदन, अक्षता, फुले, मेहंदी, लाल वस्त्र, नारळ, धूप, दिवा आणि मिठाई तसेच इतर पूजेचे साहित्य घ्यावे. पूजेनंतर देवीला नमस्कार करावा. यानंतर आरती करून पूजा पूर्ण करा.

उत्तराखंडच्या चार धाममधील एक यमुनोत्री
यमुना देवीचे उगमस्थान हिमाचल प्रदेशातील उत्तरकाशी जिल्ह्यात आहे. येथे यमुनोत्री धाम आहे. टिहरी गढवालचे महाराज प्रतापशाह यांनी १९१९ मध्ये यमुना देवीला समर्पित हे मंदिर बांधले होते, पण भूकंपामुळे हे मंदिर ढासळले होते. यानंतर 19व्या शतकात जयपूरच्या महाराणी गुलेरिया यांनी हे मंदिर पुन्हा बांधले. यमुनोत्रीचा खरा स्रोत गोठलेल्या बर्फाचे आणि हिमनद्यांचे (चंपासर हिमनदी) सरोवर आहे. यावर्षी 3 मे रोजी अक्षय्य तृतीयेला यमुनोत्री धामचे दरवाजे उघडतील.

बातम्या आणखी आहेत...