आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडचे पंचकेदार:17 मे रोजी केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ आणि 24 मे रोजी मध्यमहेश्वरचे उघडणार कपाट

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंमध्ये महादेवांच्या पाच पौराणिक मंदिरांचा एक समूह आहे. याला पंचकेदार असे म्हणतात. या समूहात केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्यमहेश्वर आणि कल्पेश्वर महादेव मंदिरांचा समावेश आहे. कल्पेश्वर मंदिर सोडून इतर चार मंदिर हिवाळ्यात भक्तांसाठी बंद राहतात. उन्हाळ्यात ही मंदिरे भक्तांसाठी उघडली जातात.

केव्हा कोणत्या मंदिराचे कपाट उघडणार
उत्तराखंड चारधाम देवस्थान बोर्डचे मीडिया प्रभारी डॉ. हरीश गौड यांनी दिलेल्या माहितीनुसार 17 मे रोजी केदारनाथ, तुंगनाथ आणि रुद्रनाथचे कपाट उघडले जातील. त्यानंतर काही दिवसांनी 24 मे रोजी मध्यमहेश्वरचे कपाट उघडतील. कल्पेश्वर मंदिर वर्षभर भक्तांसाठी उघडे राहते. या व्यतिरिक्त बद्रनाथ धामचे कपाट 18 मे रोजी, गंगोत्री-यमुनोत्रीचे कपाट 14 मे रोजी उघडतील.

पंचकेदार मंदिराशी संबंधित खास गोष्टी
केदारनाथ धाम
पंचकेदारमधील एक केदारनाथ मंदिर उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. केदारनाथ 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे राज्यातील चारधाममधील एक धाम आहे.

तुंगनाथ मंदिर
तुंगनाथ मंदिर रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. पंचकेदारमध्ये हे मंदिर सर्वात जास्त उंचीवर स्थित आहे.

रुद्रनाथ मंदिर
रुद्रनाथ मंदिर उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात आहे. रुद्रनाथ मंदिरात महादेवाच्या एकानन म्हणजे मुखाची पूजा होते.

मध्यमहेश्वर मंदिर
हे मंदिर रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. येथे महादेवाच्या नाभीची पूजा होती.

कल्पेश्वर मंदिर
या मंदिरात महादेवाच्या जटांची पूजा होती. हे मंदिर उत्तराखंडच्या गढवाल क्षेत्रामध्ये स्थित आहे.

बातम्या आणखी आहेत...