आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शहरातील सर्वात मोठ्या दागिन्यांच्या दुकानात एक उंदीर घुसला. तेथे त्याने कोट्यवधी रुपयांचा हिरा गिळला. त्या वेळी एका नोकराने त्याला पाहिले, पण तो त्याला पकडण्यासाठी धावला तेव्हा उंदीर तिथून पळून गेला. दुकानाच्या मालकाने एक जाहिरात देऊन जाहीर केले की, जो कोणी उंदराची शिकार करून हिरा आणेल त्याला लाखो रुपये बक्षीस म्हणून देण्यात येतील. जाहिरात पाहून बरेच लोक शेकडो उंदीर राहत असलेल्या दुकानाजवळच्या भागात गेले, पण सर्व उंदीर सारखे दिसत होते, म्हणून कोणत्या उंदराने हिरा गिळला हे कोणालाही समजू शकले नाही.
अखेरीस एक माणूस थेट उंदराकडे गेला आणि त्याला पकडून त्याच्या पोटातून हिरा काढला. हे पाहून दुकान मालक आश्चर्यचकित झाला. त्याने त्या माणसाला बक्षीस दिले आणि विचारले, ‘इतक्या उंदरांपैकी तुला याच उंदराने हिरा गिळला हे कसे समजले?’ त्या माणसाने उत्तर दिले, ‘हा उंदीर एकटाच इतर उंदरांपासून दूर, उंच जागी एकटा बसला होता.’
तात्पर्य : श्रीमंतीच्या घमेंडीत स्वत:ला उच्च समजल्यास माणूस एकटा पडतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.