आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अष्टविनायक महिमा:अष्टविनायकांतील पहिला गणपती मोरगावचा श्री मोरेश्वर

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गजाननाचे हे आवडते स्थान मानले जाते

अष्टविनायकांतील पहिला गणपती अशी मोरेश्वराची ओळख. पुणे जिल्ह्यात मोरगाव येथे हे मंदिर आहे. एका मोठ्या गढीप्रमाणे असलेल्या या मंदिराचे बांधकाम आदिलशाही कालखंडात झाले होते. गजाननाचे हे आवडते स्थान मानले जाते.

मूर्तीची वैशिष्ट्ये : डोळ्यात हिरा
मोरेश्वराची मूर्ती बैठी व डाव्या सोंडेची आहे. पूर्वाभिमूख असलेल्या या मूर्तीच्या डोळ्यात, बेंबीत हिरे बसवण्यात आले आहेत. मूर्तीच्या मस्तकावर नागराज विराजमान आहेत. गणेशाच्या दोन्ही बाजूंना रिद्धी-सिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत. समोर मूषक आणि मोर आहे. मंदिराच्या समोरील बाजूस एक नंदीही आहे. मोगलकाळात मंदिरांवर होणारी आक्रमणे पाहता मंदिराच्या रक्षणासाठी ५० फूट उंचीची संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. सुखकर्ता-दु:खहर्ता ही आरती समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात सुचली आहे, असे मानले जाते.

आख्यायिका : सिंधुसुराचा वध
सृष्टीचा रचेता ब्रह्मदेवाने सर्वात प्रथम मोरेश्वराची मूर्ती बनवली होती अशी पुराणात आख्यायिका आहे. सिंधुसुर नावाच्या राक्षसाने ही मूर्ती तोडली. यानंतर त्याने पृथ्वीवर उत्पात माजवला. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सर्व देवतांनी गणेशाला साकडे घातले आणि गजाननाने आपले वाहन मोरावर बसून त्याचा वध केला. त्यामुळे येथील गणपतीला मयूरेश्वर गणेश म्हणून ओळखले जाते. आश्चर्य म्हणजे मोरगावात मोरांचीही संख्या सर्वाधिक आहे.

असे पोहोचाल मोरगावला
मोरगाव हे पुणे जिल्ह्यात येते. पुणे रेल्वेस्टेशनपासून मोरगाव, हडपसर-सासवड आणि जेजुरीमार्गे ६५ किलोमीटर आहे.
पुणे-सोलापूर मार्गावर पुण्याहून ५५ किलोमीटर अंतरावर चौफुला येथून २५ किलोमीटर अंतरावर मोरगाव आहे.