आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपंचमी विशेष:सोमवारी रात्री उघडणार नागचंद्रेश्वर मंदिराचे पट, वर्षातून एकदाच उघडते हे मंदिर

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपंचमी मंगळवार, 2 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या शिखरावर असलेल्या नागचंद्रेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी जाता येते. हे मंदिर वर्षातून फक्त एक दिवस नागपंचमीला उघडले जाते. सोमवार, 1 ऑगस्ट रोजी मध्यरात्री विशेष पूजेनंतर मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. यानंतर मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 रोजी मध्यरात्री 12 वाजता मंदिर बंद करण्यात येईल.

नागचंद्रेश्वर देवाची होणार त्रिकाल पूजा
श्री महाकालेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीचे प्रशासक गणेशकुमार धाकड यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपंचमीला भगवान नागचंद्रेश्वराची त्रिकाल पूजा करण्यात येणार आहे. सोमवारी रात्री 12 वाजता दरवाजे उघडल्यानंतर श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्याचे महंत विनित गिरी महाराज नागचंद्रेश्वराची पूजा करतील. त्यानंतर सर्वसामान्य भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

अशी आहे नागचंद्रेश्वराची मूर्ती
महाकाल मंदिरात असलेली नागचंद्रेश्वराची मूर्ती 11 व्या शतकातील आहे. या मूर्तीमध्ये फणा पसरवलेल्या नागाच्या आसनावर महादेवासोबत देवी पार्वती बसलेल्या आहेत. ही कदाचित जगातील एकमेव अशी मूर्ती आहे, ज्यामध्ये शिव नाग शय्येवर विराजमान आहेत. या मंदिरात शिव, माता पार्वती, श्रीगणेश यांच्यासह सप्तमुखी नाग देव आहेत. यासोबतच दोघांचे वाहन नंदी आणि सिंह देखील विराजमान आहेत. शिवाच्या गळ्यात आणि हातातही साप गुंडाळलेले आहेत.

नागपंचमी सणाला लाखो भाविक दर्शन घेणार
दरवर्षी लाखो भाविक नागपंचमीला महाकालेश्वर मंदिरात पोहोचतात आणि महाकालसह नागचंद्रेश्वराचे दर्शन घेतात. यंदाही लाखो भाविक येथे पोहोचणार आहेत.

सुमारे 300 वर्षे जुने आहे महाकाल मंदिर
महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. प्राचीन धर्मग्रंथातही महाकालेश्वराचा उल्लेख आहे, परंतु महाकाल मंदिराची सध्याची इमारत सुमारे 250 ते 300 वर्षे जुनी आहे. महाकाल मंदिर मुघलांच्या काळात नष्ट झाले. महाकाल मंदिराची नंतर मराठा राजांनी पुनर्बांधणी केली.

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे दक्षिणमुखी
बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाकालेश्वर हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. या मंदिराचा क्रम बारा ज्योतिर्लिंगांपैकी तिसरा आहे. दक्षिणमुखी असल्यामुळे महाकालाच्या दर्शनाने मृत्यूचे भय व सर्व दुःख दूर होतात. महाकाल मंदिरात दररोज सकाळी भस्म आरती केली जाते. या मंदिराची ही सर्वात खास गोष्ट आहे. प्राचीन काळी या भागाला महाकाल वन असे म्हटले जायचे. स्कंद पुराणातील अवंती भाग, शिव महापुराण, मत्स्य पुराण तसेच इतर ग्रंथांमध्येही महाकाल वनाबद्दल सांगितले आहे. मंदिराच्या वरच्या मजल्यावर नागचंद्रेश्वर मंदिर आहे.

बातम्या आणखी आहेत...