आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एक सराफ होता. त्याचे अकाली निधन झाले. कुटुंबात त्याची पत्नी व छोटा मुलगा होता. सराफाच्या पत्नीने बचतीच्या आधारे दीर्घ काळ व्यतीत केला. एकेदिवशी मुलाला एक पिशवी आणि सराफाचा पत्ता देत ती म्हणाली - हे आपले नातेवाईक आहेत. त्यांना संपूर्ण गोष्ट सांगून दागिने विकून ये. मुलगा सराफाच्या दुकानात गेला. सराफाने दागिने पाहिले, परंतु ते मुलाकडे परत केले आणि म्हणाले- आईला सांग, योग्य भाव आल्यावर दागिने विकले तर किंमत चांगली येईल. राहिली गोष्ट तुझे शिक्षण आणि घरखर्चाची. तर उद्यापासून तू दुकानात मला मदत कर, मी तुझा खर्च भागवीन. वर्षानुवर्षे मुलाने त्याच्याकडे काम केले.
एक दिवस सराफ मुलाला म्हणाला - उद्या ती पिशवी आण. सध्या भाव चांगला आहे. मुलगा घरी गेला व त्याने आईकडून पिशवी घेऊन ती उघडली. पण दागिने बनावट होते. उद्या त्या सराफाला काय सांगावे, हे त्याला कळेना. तथापि, दुसऱ्या दिवशी तो सराफाकडे गेला आणि त्याने विचारले - त्याच दिवशी तुम्ही मला दागिने बनावट असल्याचे का सांगितले नाही? सराफ म्हणाला- तुला त्याच दिवशी सांगितले असते तर तू व तुझ्या आईला वाटले असते की तुमच्यावरचे संकट पाहून मी बदलून गेलो आहे. म्हणून मी योग्य वेळेची वाट पाहिली. मुलाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते.
तात्पर्य : वेळ व अनुभव हे सर्वात मोठे शिक्षक आहेत. कुणीच न शिकवू शकणारी गोष्ट हे शिकवतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.