आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्ञानाच्या गोष्टी:महाभारताच्या या 8 नीती, आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देतात

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाभारताच्या शांतिपर्व, वनपर्व आणि अनुशासन पर्वामध्ये सांगण्यात आले आहेत यशाचे विविध सूत्र

महाभारताला पाचवा वेद मानण्यात आले आहे. महाभारतमध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान इतर कुठेही नसल्याचे मानले जाते. यामध्ये जीवनाशी संबंधित विविध नीती सांगण्यात आल्या आहेत, ज्या आधुनिक जीवनातही कामी येऊ शकतात. महाभारत युद्धानंतर शांती पर्वमध्ये पितामह भीष्म यांनी युधिष्टिरला जे ज्ञान दिले ते आजही राजनीती आणि सामाजिक कार्यात सर्वात उत्तम ज्ञान मानले जाते. आज आम्ही तुम्हाला महाभारतातील अशाच 8 नीती सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही जीवनातील विविध अडचणींपासून दूर राहू शकता...

1. धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्या आणि सज्जन, ज्ञानी लोकांची खिल्ली उडवणाऱ्या लोकांचा विनाश लवकर होतो. (महाभारत, वनपर्व)

2. खोटे बोलणे किंवा खोट्या गोष्टीला समर्थन देणे एक असे अज्ञान आहे, ज्यामध्ये बुडालेले लोक कधीही खरे ज्ञान किंवा यश प्राप्त करू शकत नाहीत. (महाभारत, शांतिपर्व)

3. जे काम केल्याने पुण्याची प्राप्ती आणि इतरांचे भले होत असेल ते काम करण्यात उशीर करू नये. मनामध्ये असे काम करण्याचा विचार आल्यानंतर ते लगेच करून टाकावे. (महाभारत, शांतिपर्व)

4. पृथ्वीवर चांगले ज्ञान, शिक्षण हेच स्वर्ग असून वाईट सवयी आणि अज्ञान नरक आहे. (महाभारत, शांतिपर्व)

5. मोह, हव्यासाने व्यक्तीला मृत्यू आणि सत्याने दीर्घायुष्य व सुखी जीवन प्राप्त होते. (महाभारत, शांतिपर्व)

6. पुण्य कर्म अवश्य करावे परंतु त्याचा दिखावा करू नये. जो व्यक्ती समाजामध्ये लोकांनी आपले कौतुक करावे यासाठी पुण्य कर्म करतो त्याला त्याचे शुभफळ कधीही प्राप्त होत नाही. (महाभारत, अनुशासनपर्व)

7. सर्वांना सामान वागणून आणि नयन देणारा तसेच इतरांबद्दल मनामध्ये प्रेमाची भावना ठेवणारा व्यक्ती जीवनात सर्व सुख प्राप्त करतो. (महाभारत, वनपर्व)

8. स्वतःचे मन आणि इंद्रिय वशमध्ये ठेवणाऱ्या मनुष्याला जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत नाही. अशा लोकांच्या मनामध्ये इतरांचे सुख, धन पाहूनही वाईट विचार येत नाहीत. (महाभारत, वनपर्व)

बातम्या आणखी आहेत...