आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अष्टविनायक महिमा:भक्तांच्या चिंतांचे हरण करणारा थेऊरचा चिंतामणी गणेश

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आख्यायिका : कदंब वृक्षाखाली गणासुराचा वध

अष्टविनायकातील दुसरा गणपती म्हणजेच थेऊर येथील चिंतामणी गणेश. हे ठिकाणही पुणे जिल्ह्यातच येतं. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा हा गणपती मानला जातो.

मूर्तीची वैशिष्ट्ये : डोळ्यात लाल मणी आणि हिरे
मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे. डाव्या सोंडेची ही मूर्ती आसन घालून बसलेली व पूर्वाभिमुख आहे. दोन्ही डोळ्यात लाल मणी आणि हिरे आहेत. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवलेले आहे. युरोपियन प्रवाशांकडून पेशव्यांना त्या काळात पितळाच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाड येथे तर दुसरी थेऊरला आहे.

आख्यायिका : कदंब वृक्षाखाली गणासुराचा वध
कपिलमुनींजवळ सर्व मनोकामना पूर्ण करणारे चिंतामणी हे रत्न होते. गणासुर नावाचा राक्षस एकदा त्यांच्या आश्रमात आला. कपिलमुनींनी त्याला त्याच्या इच्छेनुसार पंचपक्वान्नाचे जेवण दिले. गणासुर चिंतामणी रत्नाच्या प्रेमात पडला. त्याने हे रत्न चोरले. कपिलमुनींनी रत्न परत मिळावे यासाठी श्री. गणेशाची आराधना केली. गणेशाने गणासुराचा वध केला. मुनींना रत्न परत मिळवून दिले. मुनींनी प्रसन्न होत ते रत्न गजाननाच्या गळ्यात घातले. तेव्हापासून गजाननाला चिंतामणी म्हणून ओळखले जाऊ लागले.

असे पोहोचाल थेऊरला
पुणे- सोलापूर रेल्वे मार्गावर पुण्यापासून २५ किलोमीटर अंतरावर थेऊर आहे. लोणी गावापासून केवळ सात किलोमीटर अंतरावर थेऊर येते.