आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरुपती:देशातील सर्वात श्रीमंत मंदिराने सांगितले, असे होईल बालाजी दर्शन; केशदान नाही

तिरुपती2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 11 जूनपासून भाविकांना मंदिर खुले होणार

तिरुमला येथील प्रसिद्ध व्यंकटेश्वर मंदिरात ८ जूनपासून तीन दिवसांचे ट्रायल सुरू होणार आहे. यानंतर भाविकांसाठी ११ जूनपासून मंदिर उघडणार आहे.  मंदिरात दररोज सकाळी ६.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत ६ ते ७ भाविक दर्शन घेऊ शकतील. तर मागील काळात दररोज ६० ते ७० हजार भाविक दर्शन घेत होते. तिरुपती-तिरुमला देवस्थानचे चेअरमन वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी सांगितले, दर तासाला फक्त ५०० भाविक दर्शन घेऊ शकतील. मंदिरात दहा वर्षांखालील लहान मुले व ६५ वर्षे वयावरील वृद्धांना प्रवेश देण्यात येणार नाही. अशाच प्रकारे कंटेन्मेंट झोनमधून आलेल्या भाविकांनाही प्रवेश प्रतिबंधित असेल. भाविकांची व्यवस्था पाहणारे सर्व कर्मचारी पीपीई किट वापरतील. भाविकांच्या प्रवासाचा इतिहास पाहिला जाईल. दररोज ३०० रुपये किमतीचे ३ हजार तिकिटे विशेष दर्शनासाठी ऑनलाइन उपलब्ध राहतील. तर नि:शुल्क ३००० तिकिटे उपलब्ध असतील. 

ऑनलाइन तिकीट विक्री ८ जूनपासून सुरू 

डोंगरावर चढण्यापूर्वी सर्व वाहने सॅनिटाइझ केली जातील. तर बॅरिकेडझस दर दोन तासांनी सॅनिटाइझ केली जातील. पायी मार्ग काही दिवसांसाठी बंद राहील. हुंडीजवळ भाविकांना हर्बल सॅनिटायझर उपलब्ध असेल. भाविकांना हुंडीला स्पर्श करता येणार नाही. अन्न प्रसाद मर्यादित भाविक घेऊ शकतील. प्रत्येक गेस्ट हाऊसमध्ये केवळ दोन भाविकांना राहण्याची सोय असेल. २ दिवसांपेक्षा अधिक काळ त्यांना थांबता येणार नाही. तिरुमला येथे खासगी हॉटेल्स उघडण्याची अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. अनेक रीतिरिवाजांवर प्रतिबंध असेल. केशदान करण्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

बातम्या आणखी आहेत...