आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुळजापूर:आज आश्विन पौर्णिमा, तुळजाभवानी आईची सिंहासनावर प्रतिष्ठापना

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने शहरात होणारी भाविकांची गर्दी टाळण्यासाठी तीर्थक्षेत्र तुळजापूरकडे येणारे सर्व रस्ते गुरुवारी सायंकाळी बंद करण्यात आले आहेत. गेल्या ५ दिवसांपासूनची मंचकी निद्रा संपवून शनिवारी पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. दरम्यान, काेरेानाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रथमच सोलापूरच्या मानाच्या काठ्या गाडीने येणार आहेत.

आश्विन पौर्णिमेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, सर्वत्र बॅरिकेडिंग केले आहे. सीमोल्लंघन सोहळ्यानंतर श्रम निद्रेसाठी नगरच्या पलंगावर विसावलेली तुळजाभवानी मातेची शनिवारी पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. सोलापूरच्या मानाच्या काठ्यांचे दुपारी शहरात आगमन होईल, तर रात्री उशिरा सोलापूरच्या काठ्यांसह छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. दरवर्षी पायी चालत येणाऱ्या शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्या शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास शहरात दाखल होतील.