आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिव पूजेचा संयोग:आज सोम प्रदोष, 22 तारखेला मासिक शिवरात्री आणि 23 नोव्हेंबरला कार्तिक अमावस्या

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील शेवटचे 3 दिवस भगवान भोलेनाथांच्या पूजेसाठी खास असतील. या दिवसांमध्ये प्रदोष, शिवरात्री आणि अमावस्या योग जुळून येत आहे. शिवपुराणानुसार या दिवसांमध्ये महादेवाला दूध आणि गंगेच्या पाण्याने अभिषेक करावा आणि दिवसभर उपवास करून विशेष पूजा करावी. असे केल्याने सर्व समस्या दूर होतात आणि आयुष्यही वाढते.

शारीरिक समस्या होतील दूर
कार्तिक महिन्यातील प्रदोष, शिव चतुर्दशी आणि अमावस्येला पहाटे उठून भगवान भोलेनाथांना जल आणि दुधाचा अभिषेक करावा. यानंतर शिवलिंगावर धोत्रा आणि बेलपत्र अर्पण करावे. तसेच भगवान शंकराला हंगामी फळांचा नैवेद्य दाखवावा. या तीन दिवसात गूळ, तीळ आणि धान्य दान करणे खूप शुभ राहते. या वस्तूंचे दान केल्याने शारीरिक समस्या दूर होतात.

शिवपूजेचे 3 दिवस...

सोम प्रदोष : 21 नोव्हेंबर, सोमवार
या दिवशी उपवास ठेवावा आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी महादेवाची पूजा करावी. या दिवशी शिवलिंगावर बेलाची पाने आणि पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करा. तसेच तुपाचा दिवा लावावा. मातीच्या भांड्यात पाणी भरून ते शिव मंदिरात दान करावे.

शिव चतुर्दशी : 22 नोव्हेंबर, मंगळवार
या दिवशी मासिक शिवरात्रीचे व्रत केले जाते. या तिथीला भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करावी. या दिवशी देवी पार्वतीला सौभाग्यवस्तू म्हणजेच 16 अलंकार अर्पण केले जातात. त्यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी वाढते आणि मनोकामनाही पूर्ण होतात.

कार्तिक अमावस्या : 23 नोव्हेंबर, बुधवार
हा कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाचा शेवटचा दिवस असेल. या अमावस्येला प्रदोष काळात महादेवाची पूजा करावी. प्रदोष काळ म्हणजे दिवस संपण्यापूर्वीची वेळ आणि रात्रीची सुरुवात. या शुभकाळात महादेवाची विशेष पूजा अभिषेक आणि महामृत्युंजय मंत्राने करावी. त्यामुळे शारीरिक समस्या दूर होऊ लागतात. यासोबतच शनि आणि पितृदोषाचा प्रभावही कमी होऊ लागतो.

बातम्या आणखी आहेत...