आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गशीर्ष मासातील सफाला एकादशी आज:या दिवशी श्रीविष्णू पूजेने मिळेल वर्षानुवर्षे तपश्चर्या केल्याचे पुण्य

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी आहे. म्हणजेच सफाला एकादशी. या दिवशी भगवान श्रीविष्णूची पूजा करून व्रत केल्याने कळत-नकळत झालेली पापे दूर होतात. पुराणानुसार हे व्रत केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात. या एकादशीचे देवता श्रीनारायण आहेत. विधिपूर्वक व्रताचे नियम पाळल्यास सर्व प्रकारचे पाप आणि दोष नष्ट होतात. या एकादशी व्रताने यश मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात. म्हणूनच सफाला एकादशीचे व्रत विशेष मानले जाते.

व्रत आणि पूजेचे अनेक पटींनी पुण्य
सफला एकादशी व्रताचे पूजनीय देवता भगवान श्रीविष्णू आहेत. शास्त्रानुसार जो व्यक्ती भगवान विष्णूंची उपासना करत एकादशी व्रत आणि रात्री जागरण करतो त्याला अनेक वर्षांच्या तपश्चर्येचे पुण्य प्राप्त होते. पूर्ण भक्तिभावाने पूजा केल्याने तुम्हाला भगवान श्रीविष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. या एकादशीच्या व्रताने दु:ख आणि दोषही संपतात.

व्रत करणे शक्य नसल्यास काय करावे
जर तुम्ही आजारपणामुळे किंवा कोणत्याही कारणाने व्रत करू शकत नसाल तर तुम्ही भगवान श्रीविष्णूची पूजा अवश्य करावी. सूर्योदयापूर्वी उठून भगवान श्रीविष्णूची पूजा करावी. ऊँ नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. तसेच या तिथीला तांदूळ, लसूण, कांदा, मांस खाऊ नये. अल्कोहोल आणि इतर सर्व मादक पदार्थांपासून दूर रहावे.

सर्व व्रतांपैकी सर्वोत्तम एकादशी व्रत
भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की ज्याप्रमाणे सापांमध्ये शेषनाग श्रेष्ठ, पक्ष्यांमध्ये गरुड, सर्व ग्रहांमध्ये चंद्र, यज्ञांमध्ये अश्वमेध आणि देवतांमध्ये भगवान विष्णू श्रेष्ठ आहेत, त्याचप्रमाणे एकादशीचे व्रत सर्व उपवासांमध्ये श्रेष्ठ आहे. जे लोक नेहमी एकादशीचे व्रत करतात, ते मला खूप प्रिय आहेत.

बातम्या आणखी आहेत...