आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविवारी नदी स्नान आणि दानधर्माचा उत्सव:माघी पौर्णिमेला प्रयागराजच्या संगमावर देवी-देवताही स्नानासाठी येतात

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 5 फेब्रुवारीला माघ महिन्याची पौर्णिमा आहे. हा नदीस्नान आणि दानधर्म करण्यासाठी एक उत्तम उत्सव आहे. कारण या तिथीला प्रयागराजच्या संगमावर देवी-देवताही स्नान करण्यासाठी येतात अशी मान्यता आहे. या विश्वासामुळे लाखो भाविक संगमात स्नान करण्यासाठी प्रयागराजला पोहोचतील.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, 5 फेब्रुवारीला सर्वार्थसिद्धी योगामुळे माघी पौर्णिमेचे महत्त्व अधिकच वाढले आहे. संत रविदास दास यांची जयंतीही याच तारखेला साजरी केली जाते. ज्यांना प्रयागराजमध्ये स्नान करणे शक्य नसेल त्यांनी आपल्या परिसरातील पवित्र नदीत स्नान करावे. ज्यांना नदीत स्नान करणेही शक्य नसेल त्यांनी घरातील स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे.

अशाप्रकारे साजरी करावी माघ पौर्णिमा

  • या सणाच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी अंथरुण सोडावे. पाण्यात गंगेचे पाणी, काळे तीळ, चंदन मिसळून स्नान करावे. स्नान करताना सर्व पवित्र तीर्थस्थाने आणि पवित्र नद्यांचे ध्यान करावे. स्नानाच्या पाण्यात त्यांचे आवाहन करावे. असे स्नान केल्याने घरच्या घरी तीर्थस्नानासारखे पुण्य प्राप्त होते.
  • स्नानानंतर तांब्याच्या कलशात पाणी भरून लाल फुले, तांदूळ, अबीर, गुलाल टाकून ऊँ सूर्याय नमः मंत्राचा उच्चार करून सूर्याला अर्पण करा.
  • सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर घरातील मंदिरात श्रीगणेशाची पूजा करावी. केशर दुधाने भगवान श्रीविष्णू आणि महालक्ष्मीचा अभिषेक करावा. तसेच लोणी-साखरेचा तुळशीची पाने टाकून नैवेद्य दाखवावा.
  • हनुमानासमोर उदबत्ती लावून हनुमान चालीसा आणि सुंदरकांडचा पाठ करावा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही रामायण, श्रीमद भगवद् कथेचे देखील पाठ करू शकता.
  • घरामध्ये पूजा केल्यानंतर काळे तीळ, अन्न, वस्त्र, धान्य गरजू लोकांना दान करा. या तिथीला सत्यनारायण कथा वाचावी किंवा ऐकावी. पौर्णिमेला कथा सांगण्याची परंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे.
  • संध्याकाळी चंद्र उगवल्यानंतर चांदीच्या भांड्यात जल घेऊन अर्घ्य द्यावे. या दरम्यान ऊँ पुत्र सोमय नमः मंत्राचा जप करावा.
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही शिवलिंगाचा जलाभिषेकही करू शकता. तसेच दुर्गा देवीची पूजा करा.
बातम्या आणखी आहेत...