आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केरळातील 1,248 मंदिरानाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या त्रावणकोर देवस्वोम बोर्ड आपले उत्पन्न वाढवण्यासाठी मंदिरांचे जवळपास 1200 किलो सोने आरबीआयकडे ठेवण्याच्या तयारीत आहे. यामुळे बोर्डाला प्रत्येक वर्षी जवळपास 13.5 कोटी रुपयांचे उत्पन्न होईल. हे सोने सध्या मंदिरात दागिने आणि भांड्याच्या स्वरूपात आहे. बोर्ड हे दागिने वितळवून सोन्यामध्ये बदलेल. या सोन्याची किंमत अंदाजे 540 कोटी आहे. त्रावणकोर बोर्डाच्या अधिकारात पद्मनाभम स्वामी, सबरीमाला आणि गुरुवायूर यासारखे मोठे मंदिर येतात.
दानात मिळालेले सोन्याचे दागिने आणि भांडे वितळवणार
केरळातील या मंदिरांकडे प्राचीन आणि ऐतिहासिक दागिनेही आहेत. बोर्ड हे प्राचीन दागिने तसेच ठेवणार आहे. या दागिन्यांची किंमत कोटींमध्ये असून हे उत्सवामध्ये उपयोगात आणले जातात. या योगामध्ये फक्त दानात मिलेल्या दागिने आणि भांड्याचा वापर केला जाईल. यासोबतच बोर्ड 28 प्रमुख मंदिरांमध्ये ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करत आहे. यामुळेही मंदिरांचे उत्पन्न वाढू शकते.
बोर्ड मीटिंगमध्ये होणार निर्णय
बोर्डाचे अध्यक्ष एन. वासु यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार मंदिरांमध्ये असलेल्या सोन्याचे मूल्यमापन केले जात आहे. हे 1200 किलोपेक्षा जास्तच असेल. यातून बोर्डाला 2.5 टक्के रिटर्न हिशोबाने वर्षाला 13 कोटी पेक्षा जास्त रक्कम मिळू शकते. लवकरच बोर्ड मीटिंगमध्ये हा प्रस्ताव मांडून निर्णय घेतला जाईल. या महिनाअखेर पर्यंत सोन्याचे पूर्ण मूल्यमापन केले जाईल.
शेकडो टन तांब्याच्या भांड्यांचा लिलाव
यापूर्वी त्रावणकोर बोर्डाने आपली आर्थिक स्थिती सुधारणेसाठी मंदिरातील शेकडो टन तांब्याचे दिवे आणि भांड्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता परंतु यावर वाद निर्माण झाल्याने बोर्डाने लिलाव रद्द केला. या प्रकरणाचे केरळ हायकोर्टानेही बोर्डाकडे उत्तर मागितले आहे. लोकांनी या लिलावाला विरोध केला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.