आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तुळजाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी प्रारंभ होत आहे. मंचकी निद्रेसाठी आवश्यक पुजारी, सेवेकरी, मानकऱ्यांच्या गुरुवारी (दि. ८) घेण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये सर्व ९२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी तुळजाभवानी मंदिरात सॅनिटायझेशनच्या कामास प्रारंभ करण्यात आला.
तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस शुक्रवारी प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी शुक्रवारी सकाळपासूनच देवीचे सेवेकरी पलंगे परिवाराच्या वतीने पलंग घासून पुसून धुवून स्वच्छ करून, नवार पट्ट्या बांधून, नवीन गाद्या टाकून तुळजाभवानी मातेचा मंचकी निद्रेसाठी पलंग तयार ठेवला जाईल. त्याचवेळी आराधी महिला गाद्यांचा कापूस पिंजून ठेवतील, तर गादीचे मानकरी गाद्या शिवतील.
या अनुषंंगाने महोत्सवात मंदिरात प्रवेशासाठी अँटिजन टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार प्रवेशाच्या एक दिवसापूर्वी गुरुवारी मंदिरात सेवेकरी, मानकरी आदी ९२ लोकांच्या अँटिजन टेस्ट करण्यात आल्या. सर्वच्या सर्व ९२ टेस्ट निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नवरात्र महोत्सव २०२० चे धार्मिक विधी.
- दि. ९ सायंकाळी मंचकी निद्रेस प्रारंभ. - दि. १७ पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना. - दि. १७ दुपारी १२ वाजता घटस्थापना, रात्री छबिना. - दि. १८ देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना. - दि. १९ देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना. - दि. २० ललितापंचमी, देवीची रथअलंकार पूजा व रात्री छबिना. - दि. २१ देवीची मुरली अलंकार पूजा व रात्री छबिना. - दि. २२ देवीची शेषशाही अलंकार पूजा व रात्री छबिना. - दि. २३ देवीची भवानी तलवार अलंकार पूजा व रात्री छबिना. - दि. २४ दुर्गाष्टमी, देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार पूजा व रात्री छबिना. - दि. २५ महानवमी, दुपारी १२ वाजता होमावर धार्मिक विधी, घटोत्थापन, रात्री नगरहून येणाऱ्या पलंग, पालखीची मिरवणूक. - दि. २६ उषःकाली देवीचे सीमोल्लंघन, नंतर मंचकी निद्रा.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.