आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विशेष मुहूर्त आणि योग:अधिक महिन्यात 15 दिवस राहणार शुभ योग व मुहूर्त, 9 दिवस असेल सर्वार्थसिद्धी योग, 2 दिवस राहील पुष्य नक्षत्राचा योग

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अधिकाला पुरुषोत्तम महिना का म्हणतात?

१८ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या अधिक महिन्यात १५ दिवस शुभ योग असतील. शुक्रवार, उत्तराफाल्गुनी नक्षत्र आणि शुक्ल योगात सुरू होत असलेल्या या महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (१७ ऑक्टोबर) विशेष मुहूर्त आणि योग आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मांनी सांगितले की, अधिक महिन्यात सर्वार्थसिद्धी योग ९ दिवस, द्विपुष्कर दिवस २ दिवस, अमृतसिद्धी योग १ दिवस आणि पुष्य नक्षत्र २ दिवस आहे. पौराणिक सिद्धांतांनुसार, या महिन्यात श्रीमद् देवीभागवत, श्री विष्णुपुराण, भविष्योत्तर पुराण यांचे पठण लाभदायी असते. अधिक महिन्याचे अधिष्ठाता विष्णू आहेत. त्यामुळे या काळात विष्णू मंत्रांचा जप विशेष लाभदायक असतो.

१८ सप्टेंबरपासून अधिक महिन्याची सुरुवात, कोणत्या दिवशी शुभ योग आहेत हे पाहू
प्रारंभ: अधिक महिन्याची सुरुवातच १८ सप्टेंबरला शुक्रवारी, उत्तराफाल्गुनी नक्षत्र आणि शुक्ल नावाच्या शुभ योगात होईल. हा दिवस खूप शुभ असेल.

सर्वार्थसिद्धी योग: हा योग सर्व मनोकामना पूर्ण करणारा आणि प्रत्येक कामात यश देणारा असतो. अधिक महिन्यात हा योग ९ दिवस म्हणजे २६ सप्टेंबर तसेच १,२,४,६,७,९,११, १७ ऑक्टोबर २०२० ला राहील.

द्विपुष्कर योग: द्विपुष्कर योग ज्योतिषात खूप विशेष मानला जातो. या योगात केलेल्या कोणत्याही कामाचे दुप्पट फळ मिळते, अशी मान्यता आहे. १९ आणि २७ सप्टेंबरला द्विपुष्कर योग असेल.

अमृतसिद्धी योग: अमृतसिद्धी योगाबाबत
ज्योतिष ग्रंथांची अशी मान्यता आहे की, या योगात केलेल्या कामांचे शुभ फळ दीर्घकालीन असते. २ ऑक्टोबर २०२० ला अमृतसिद्धी योग राहील.

पुष्य नक्षत्र : या वर्षाच्या अधिक महिन्यात दोन दिवस पुष्य नक्षत्र आहे. १० ऑक्टोबरला रवी पुष्य आणि ११ ऑक्टोबरला सोम पुष्य नक्षत्र राहील. या दिवशी कुठलेही आवश्यक शुभ काम करता येऊ शकते.

अधिकाला पुरुषोत्तम महिना का म्हणतात?
पौराणिक कथांनुसार, मल मास असल्याने या महिन्याचा स्वामी होण्याची कोणाचीही इच्छा नव्हती. तेव्हा या महिन्याने भगवान विष्णंूना आपल्या उद्धारासाठी प्रार्थना केली. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला स्वत:चे पुरुषोत्तम हे श्रेष्ठ नाव दिले. तसेच या महिन्यात जो भागवत कथा श्रवण, मनन, भगवान शंकराचे पूजन, धार्मिक अनुष्ठान, दान करेल त्याला अक्षय फळ मिळेल, असा आशीर्वादही दिला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser