आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविवारी उत्पत्ती एकादशी:या दिवशी प्रकट झाली होती देवी एकादशी, राक्षसाचा केला वध

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 20 नोव्हेंबर रोजी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे. या दिवशी एकादशी नावाची देवी प्रकट झाल्यामुळे तिला उत्पन्ना (उत्पत्ती) असे नाव पडले. यावेळी ही तिथी रविवारी असल्याने या दिवशी श्रीविष्णूंसोबत सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, स्कंद पुराणातील वैष्णव खंडात वर्षातील सर्व एकादशींचा उल्लेख आहे. या भागात एकादशी माहात्म्य नावाचा अध्याय आहे. यामध्ये सर्व एकादशींची माहिती देण्यात आली आहे. कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीबद्दल असे मानले जाते की, या तिथीला एक देवी प्रकट झाली होती. या देवीचे नाव एकादशी आहे. यामुळे या एकादशीचे नाव उत्पत्ती एकादशी पडले.

एकादशीने केला होता मूर नावाच्या राक्षसाचा वध
प्राचीन काळी मूर नावाचा राक्षस होता. तो खूप शक्तिशाली होता. त्याने देवांचा पराभव करून स्वर्ग काबीज केला होता. देवराज इंद्र मदतीसाठी श्रीविष्णूंकडे पोहोचले. श्रीविष्णुंनी देवांची प्रार्थना ऐकली आणि मूर राक्षसाचा वध करण्याचा निर्णय घेतला. यानंतर श्रीविष्णू आणि मूर असुर यांच्यात युद्ध सुरू झाले.

या दोघांचे युद्ध बराच काळ चालले, परंतु श्रीविष्णू मूरला पराभूत करू शकले नाहीत. विष्णूजी थकले होते. यामुळे ते बद्रिकाश्रमाच्या गुहेत विश्रांतीसाठी गेले.

मूर राक्षसही भगवान विष्णूंचा पाठलाग करत तिथे पोहोचला. त्यावेळी श्रीविष्णू विश्रांती घेत होते. मूर श्रीविष्णूवर हल्ला करणार होता, त्याच वेळी तेथे एक देवी प्रकट झाली. देवीने मूरचा वध केला. त्या दिवशी कार्तिक कृष्ण पक्षाची एकादशी होती.

श्रीविष्णूची विश्रांती संपल्यावर त्यांनी डोळे उघडले. समोर देवीला पाहिल्यावर देवीने त्यांना मूर वधाची माहिती दिली. यावर श्रीविष्णू खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी देवीला वर मागण्यास सांगितले.

देवीने वरदान मागितले की, जे या तिथीला व्रत-उपवास करतील त्यांची सर्व पापे नष्ट होतील आणि त्यांचे कल्याण होईल.

देवीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी विष्णूजींनी वरदान दिले. यानंतर भगवान विष्णूंनी त्या देवीचे नाव एकादशी ठेवले. या एकादशीला देवीचा जन्म झाला म्हणून तिला उत्पत्ती एकादशी म्हणतात.

बातम्या आणखी आहेत...