आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविवारी वैकुंठ चतुर्दशी:या दिवशी भगवान शिव विश्व संचालनाचा कार्यभार भगवान विष्णूंकडे सोपवतील

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी रविवारी साजरी होणार आहे. याला वैकुंठ चतुर्दशी असेही म्हणतात. या रात्री हरि-हर मिलन होणार आहे. हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे भगवान शिव. या दिवशी भगवान शिव विश्व संचालनाचा कार्यभार भगवान विष्णूंकडे सोपवतील.

पौराणिक मान्यतेनुसार, भगवान विष्णू चातुर्मासात संपूर्ण जगाची सत्ता महादेवांच्या हाती देऊन क्षीरसागरात विश्रामासाठी जातात. वैकुंठ चतुर्दशीला, ही सत्ता पुन्हा भगवान विष्णूंना शिव सुपूर्द करतात.

काय आहे हरि-हर मिलनची परंपरा
स्कंद, पद्म आणि विष्णुधर्मोत्तर पुराणानुसार भगवान शिव आणि विष्णू यांची भेट कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला होते. रात्री दोन्ही देवतांची पूजा केली जाते. रात्री जागरणही केले जाते.

असे मानले जाते की, चातुर्मास संपल्यानंतर भगवान विष्णू योग निद्रातून जागे होतात आणि भगवान शिव सृष्टी सांभाळण्याची जबाबदारी पुन्हा विष्णूंकडे देतात. भगवान विष्णू वैकुंठ लोकात निवास करतात, म्हणून या दिवसाला वैकुंठ चतुर्दशी असेही म्हणतात.

पूजा आणि व्रत विधी
या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून दिवसभर व्रत ठेवण्याचा संकल्प घ्यावा.
दिवसभर काहीही न खाता मनात देवाचे नामस्मरण करावे.
भगवान विष्णूंची रात्री कमळाच्या फुलांनी पूजा करावी.
यानंतर भगवान शंकराचीही पूजा करावी.

पूजेचे मंत्र
ऊँ शिवकेशवाय नम:
ऊँ हरिहर नमाम्यहं

रात्रभर पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा शिवाची पूजा करून ब्राह्मणांना अन्नदान करावे. त्यानंतर तुम्ही स्वतः अन्न खावे. वैकुंठ चतुर्दशीचे हे व्रत शैव आणि वैष्णव यांच्या परस्पर ऐक्याचे प्रतीक आहे.

बातम्या आणखी आहेत...