आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीहरी आणि महादेवाच्या पूजेचा उत्सव:वैकुंठ चतुर्दशीपासून श्रीविष्णू करणार सृष्टीचे संचालन

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी म्हणतात. या तिथीला श्रीहरी आणि महादेवाची विशेष पूजा केली जाते. यावेळी हा सण रविवारी (6 नोव्हेंबर) आहे. पंचांग आणि तिथीतील फरक यामुळे काही ठिकाणी सोमवारीही हा सण साजरा केला जाणार आहे.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, वैकुंठ चतुर्दशीला शिव सृष्टी चालवण्याची जबाबदारी श्रीहरीकडे सोपवतात. श्रीविष्णू देवशयनी एकादशीपासून देवउठनी एकादशीपर्यंत विश्रांती घेतात, त्या काळात शिव सृष्टीचे संचालन सांभाळतात.

वैकुंठ चतुर्दशीला महादेव आणि श्रीहरीचा करावा अभिषेक
या दिवशी शिव आणि विष्णूची विशेष पूजा करावी. सकाळ संध्याकाळ श्रीगणेशाची पूजा करावी. यानंतर भगवान विष्णू, महालक्ष्मी, शिवलिंग आणि पार्वतीची पूजा करा. केशरमिश्रित दुधाने विष्णू-लक्ष्मीचा अभिषेक करावा. यासाठी दक्षिणावर्ती शंखाचा वापर करावा. दुधानंतर पाण्याने अभिषेक करावा.

शिवलिंग आणि देवी पार्वतीच्या मूर्तीवर तांब्याच्या भांड्यात जल भरून अर्पण करावे. पंचामृत अर्पण करून नंतर जल अर्पण करावे. चंदनाचा टिळा लावावा. देवाला नवीन वस्त्रे अर्पण करा. फुलांनी शृंगार करावा. शिवलिंगावर रुईची फुले, तांदूळ, बेलाची पाने इत्यादी पूजन सामग्री अर्पण करा. भगवान श्रीविष्णूला तुळस टाकून नैवेद्य दाखवावा. दिवा लावून आरती करावी. पूजेमध्ये खालील मंत्रांचा उच्चार करावा.

विष्णु मंत्र - ऊँ नमो भगवते वासुदेवाय

महालक्ष्मी मंत्र - ऊँ महालक्ष्म्यै नमो नम:

शिव मंत्र - ऊँ नम: शिवाय

देवी पार्वती मंत्र - ऊँ ह्रीं गौर्ये नमः

बातम्या आणखी आहेत...