आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्य देणारा महिना:वैशाख महिन्यात सूर्योदयापूर्वी तीर्थस्नान केल्याने मिळते महायज्ञ करण्याइतकेच शुभफळ

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैशाख, हिंदू कॅलेंडरचा दुसरा महिना, 1 मे पासून 30 मे पर्यंत राहील. या काळात भगवान श्रीविष्णूंची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. तसेच या महिन्यात तीर्थस्थळी जाणे, सूर्योदयापूर्वी स्नान आणि पूजा करण्याची प्रथा आहे. वैशाख महिन्यात अशा प्रकारे स्नान व उपासनेसह व्रत व उपवास केल्याने महायज्ञ करण्यासारखेच पुण्य प्राप्त होते.

पुराणांमध्ये वैशाख महिना
स्कंद पुराणात वैशाख महिन्याचे वर्णन सर्व महिन्यांत श्रेष्ठ सांगण्यात आले आहे. या महिन्यात सूर्योदयापूर्वी स्नान करून व्रत करावे असे पुराणात सांगितले आहे. हे व्रत केल्याने व्यक्ती कधीच गरीब होत नाही. भगवंताची कृपा त्याच्यावर राहते आणि त्याला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते. कारण या महिन्याचे देवता भगवान विष्णू आहेत. वैशाख महिन्यात जलदानाला विशेष महत्त्व आहे.

पद्म पुराणानुसार महिरथ नावाच्या राजाने केवळ वैशाख स्नानाने वैकुंठधाम प्राप्त केले होते. या महिन्यात सूर्योदयापूर्वी तीर्थक्षेत्र, तलाव,नदी, विहीर किंवा घरीच स्नान करावे. घरात स्नान करताना पवित्र नद्यांच्या नावाचा जप करावा. स्नान करून सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य द्यावे.

वैशाख महिन्यात काय करावे
1.
वैशाख महिन्यात जलदानाला विशेष महत्त्व आहे. शक्य असल्यास या दिवशी पाणपोई लावावी किंवा पाण्याचे भांडे दान करावे.
2. कोणत्याही गरजू व्यक्तीला पंखा, खरबूज, इतर फळे,धान्य दान करावे.
3. मंदिरांमध्ये जल आणि अन्न दान करावे.
4. या महिन्यात ब्रह्मचर्य पाळावे आणि सात्विक आहार घ्यावा.
5. वैशाख महिन्यात पूजा आणि यज्ञ करण्यासोबतच एक वेळ भोजन करावे.

काय करू नये
1.
या महिन्यात मांसाहार, दारू आणि इतर सर्व प्रकारच्या मादक पदार्थांपासून दूर रहा.
2. वैशाख महिन्यात शरीरावर तेल मालिश करू नये.
3. दिवसा झोपू नये
4. पितळेच्या भांड्यात अन्न खाऊ नये.
5. रात्री जेवू नये आणि पलंगावर झोपू नये.

बातम्या आणखी आहेत...