आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभ संयोग:वैशाख पौर्णिमा 26 मे रोजी, चार शुभ योगामुळे खास राहील ही तिथी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 26 मे रोजी वैशाख मासातील पौर्णिमा तिथी आहे. यावर्षी ही तिथी खास राहील. वैशाख पौर्णिमेला तीन ग्रह स्वराशीत राहतील आणि चार शुभ योग जुळून येत आहेत. ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे वैशाख पौर्णिमेला स्नान, दान आणि पूजा-पाठ केल्याचे विशेष फळ मिळू शकते. या दिवशी आंशिक चंद्रग्रहण राहील. परंतु ग्रहण समाप्त होताना ते काही काळ फक्त देशाच्या ईशान्य भागात दिसून येईल. या ग्रहणाचा सूतक आणि अशुभ प्रभाव देशावर राहणार नाही. यामुळे पौर्णिमेला करण्यात येणारे धार्मिक कर्म स्नान-दान आणि पूजा-पाठ दिवसभर केले जाऊ शकतात.

ग्रह नक्षत्रांची शुभ स्थिती
26 मे रोजी वैशाख पौर्णिमेला सर्वार्थसिद्धि, अमृतासिद्धी, शिव आणि सौम्य योग हे चार योग राहतील. तसेच बुध, शुक्र व शनि हे तीनही ग्रह आपापल्या राशि चक्रात असतील. ग्रह नक्षत्रांच्या या शुभ स्थितीमुळे, वैशाख पौर्णिमेला स्नान आणि दान करण्याचे पुण्य आणखी वाढेल.

स्नान-दानाची परंपरा
या दिवशी गंगासह 6 पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पूर्वजांची पूजा केल्यास विशेष पुण्य फळ मिळते. या दिवशी सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्नान करावे. सध्या महामारीच्या काळात या दिवशी तीर्थस्नान व दान करण्यासाठी घराबाहेर पडणे योग्य नाही. म्हणून घरीच पाण्यामध्ये गंगाजल किंवा इतर पवित्र नद्यांचे जल मिसळून स्नान करावे. या दिवशी, शुभ मुहूर्तावर दान देण्याचा संकल्प घेऊन दान करण्यात येणाऱ्या वस्तू वेगळ्या ठेवाव्यात आणि बाहेरील परिस्थिती सुधारल्यानंतर दान कराव्यात. असे केल्यानेही पुण्य मिळू शकते.

बातम्या आणखी आहेत...