आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्वमेध यज्ञाचे फळ आणि अक्षय पुण्य देणार्‍या तिथी:या तीन दिवसांत स्नान, दान आणि पूजेचे विशेष महत्त्व

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वैशाख मासातील शुक्ल पक्षातील एकादशी ते पौर्णिमा पर्यंतची प्रत्येक तिथी खूप पुण्य देणारी मानली जाते, परंतु यातील शेवटचे तीन दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ आहेत. स्कंद पुराणात या त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा तिथींना पुष्करिणी म्हटले आहे. म्हणजेच हे तीन दिवस सर्व पापांचा नाश करणारे आहेत.

या तीन दिवसांत भगवान श्रीविष्णूंची आराधना केल्याने संपूर्ण वैशाख महिन्यात ब्रह्म मुहूर्तावर तीर्थस्नान, उपवास आणि श्रीविष्णूची उपासना करण्याचे अक्षय पुण्य प्राप्त होते असे विद्वान सांगतात.

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला समुद्रातून अमृत निघाले होते. द्वादशी तिथीला भगवान विष्णूंनी त्याचे रक्षण केले. त्रयोदशीला श्रीविष्णुंनी देवतांना अमृत दिले. चतुर्दशीला देवांचा विरोध करणाऱ्या राक्षसांचा वध केला आणि पौर्णिमेला सर्व देवांना राज्य मिळाले.

भगवान श्रीविष्णूच्या तीन अवतारांच्या तिथी
वैशाख महिन्याच्या शेवटच्या तीन दिवसांत भगवान विष्णूंनी तीन अवतार घेतले होते. यामध्ये सत्ययुगात त्रयोदशी तिथीला भगवान श्रीविष्णू नृसिंहाच्या रूपात प्रकट झाले होते. प्रलयाच्या वेळी चतुर्दशीला भगवान विष्णू कासवाच्या रूपात प्रकट झाले. ज्याला कूर्म अवतार म्हणतात. त्याच वेळी वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला भगवान विष्णूंनी बुद्ध अवतार घेतला. ही तिथी बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.

देवांनी या तिन्ही तिथी विशेष बनवल्या
वैशाख महिन्यातील त्रयोदशी ते पौर्णिमा या प्रत्येक तिथीला देवतांनी वरदान दिले. वैशाखच्या या तीन शुभ तिथी मानवाच्या पापांचा नाश करतात, असे सांगितले. या दिवसात चांगले कर्म केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते. ज्या व्यक्तीला संपूर्ण वैशाख महिन्यात सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करणे शक्य झाले नसेल, त्याने जर या तीन तिथींना सत्कर्म केले तर त्याला संपूर्ण वैशाख महिन्याचे पुण्य प्राप्त होते.

वैशाख महिन्याच्या शेवटच्या तीन दिवसांत गीतेचे पठण केल्याने अश्वमेध यज्ञाइतकेच पुण्य प्राप्त होते, असे स्कंद पुराणात म्हटले आहे. या तीन दिवसांत भागवत कथा श्रवण केल्यास सर्व प्रकारची पापे नष्ट होतात. या तीन दिवसांत विष्णु सहस्रनामाचा पाठ केल्यास अनंत पुण्य मिळते.

या शेवटच्या 3 दिवसात शास्त्राचे पठण करून आणि सत्कर्म केल्याने अनेकांना देवत्व प्राप्त झाले आहे आणि ते सिद्धही झाले आहेत. त्यामुळे वैशाख महिन्याच्या शेवटच्या तीन दिवसांत स्नान, दान आणि पूजा अवश्य करावी. वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला भगवान विष्णूच्या मधुसूदन रूपाला एक हजार नावांनी दुधाचा अभिषेक केल्यास वैकुंठधाम प्राप्त होते.