आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैष्णोदेवीचे दर्शन आजपासून:6 महिन्यांपासून बंद असलेले वैष्णोदेवीचे मंदिर भक्तांसाठी उघडले, दर्शनासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आवश्यक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात सामान्य भक्तांसाठी जवळपास 6 महिन्यांपासून बंद असलेले वैष्णोदेवी मंदिर 16 ऑगस्ट, रविवारपासून सर्व भक्तांसाठी खुले झाले आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये 2 हजार भक्त देवीचे दर्शन घेऊ शकतील. कोरोनापूर्वी याठिकाणी एक दिवसात 50 ते 60 हजार भक्त देवीचे दर्शन घेत होते.

वैष्णोदेवी मंदिर जम्मू-काश्मीरमधील त्रिकुटा पर्वतावर स्थित आहे. हे मंदिर 5200 फूट उंचीवर असून जम्मूपासून 61 तर कटारापासून 13 किलोमीटर अंतरावर आहे. वैष्णोदेवीच्या तीन पिंडींमध्ये देवी काली, देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मी गुहेमध्ये विराजित आहेत. यात्रा सुरु झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात 1900 भक्त जम्मू-काश्मीरमधील आणि इतर राज्यातील 100 भक्त दर्शन घेऊ शकतील.

वैष्णोदेवी श्राइन बोर्डाचे सीईओ रमेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रा रविवार (16 ऑगस्ट) पासून सुरु होत आहे. दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागेल. सर्व भक्तांनी फोनमध्ये आरोग्य सेतू ऍप डाउनलोड करणे अनिवार्य आहे. मास्क, सोशल, डिस्टेंसिंग आणि सॅनिटायझेशनकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

यात्रेकरूंची थर्मल स्क्रिनींगही केली जाईल. 10 वर्षांखालील मुलांना, गर्भवती महिलांना, 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना दर्शनाची परवानगी नाही. यासोबतच ज्या लोकांना कोविड-19 शी संबंधित कोणतेही लक्षण आढळून आल्यास त्यांनाही दर्शनाची परवानगी नाही.

बातम्या आणखी आहेत...