आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज (5 फेब्रुवारी) वसंत पंचमीला सात शुभ योग तयार होत असून दिवसभर स्वयंसिद्ध मुहूर्त असणार आहे. देवी सरस्वतीची पूजा करण्यासाठी सकाळ ही सर्वोत्तम वेळ आहे. त्यामुळे सरस्वती पूजन दुपारी 12.20 पूर्वी करावे. काही कारणास्तव या काळात पूजा करणे शक्य नसेल तर दुपारी 3.20 ते 5.50 या वेळेत देवीची पूजा करू शकता.
पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र यांच्यानुसार, आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी राहू कुंडलीच्या पाचव्या स्थानात आहे, त्यामुळे एक बुद्धिवर्धक योग तयार होत आहे. यासोबतच भारती योग देखील आहे. भारती हे देवी सरस्वतीचे एक नाव आहे. याशिवाय वसंत पंचमीला बुधादित्य, सिद्धी, षष्ठ, शुभकर्तरी आणि सत्कीर्ती हे शुभ योगही तयार होत आहेत. एकूण सात शुभ योगांमुळे हा सण अतिशय खास बनला आहे.
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरा भाद्रपद नक्षत्र असल्यामुळे वसंत पंचमी हा सण पंचक योगात साजरा केला जाईल. वसंत पंचमी हा देवी सरस्वतीचा प्रकट उत्सव म्हणून साजरा केला जातो. यंदा 15 मार्चपासून वसंत ऋतु सुरू होत आहे. वसंत पंचमीचे महत्त्व विद्यार्थ्यांसाठी तसेच संगीत आणि लेखनाशी संबंधित लोकांसाठी खूप जास्त आहे. या दिवशी तुम्ही कोणतीही नवीन विद्या शिकण्यास सुरुवात करू शकता. याला वागीश्वरी जयंती आणि श्री पंचमी असेही म्हणतात.
सरस्वती प्रकट उत्सवाला वसंत पंचमी का म्हणतात?
माघ महिन्याच्या पाचव्या दिवशी देवी सरस्वती प्रकट झाली होती. जेव्हा देवी प्रकट झाली तेव्हा सर्व देवतांनी तिची स्तुती केली. सर्व देवांना आनंद झाला. या आनंदामुळे वसंत रागाची निर्मिती झाली. संगीत शास्त्रात वसंत रागाचा संदर्भ फक्त आनंदाचा आहे. या आनंदामुळे देवी सरस्वतीचा प्रकट उत्सव वसंत आणि वसंत पंचमी म्हणून ओळखला जाऊ लागला.
या कारणामुळे वसंत पंचमीला केली जाते देवी सरस्वतीची पूजा
पुराण कथेतील मान्यतेनुसार, ज्यावेळी ब्रह्मदेवाने भगवान विष्णुच्या आज्ञेनुसार सृष्टिची रचना केली. त्यानंतर मनुष्याची रचना केली. पण, मनुष्याची रचना केल्यानंतर ब्रह्मदेवला काहीतरी कमतरता राहिल्याचे जाणवले, मनुष्याची रचना केल्यानंतर देखील सगळीकडे मौन (शांती) पसरली आहे असे ब्रह्मदेवाच्या लक्षात आले. यानंतर भगवान ब्रह्मदेवाने विष्णुंची अनुमति घेऊन एका चर्तुभुजी स्त्रीची रचना केली, जिच्या एका हातात वीणा तर दुसरा हात वर मुद्रेत होता. इतर दोन्ही हातांमध्ये पुस्तक आणि माळा होत्या. यानंतर ब्रह्मदेवाने देवीला वीणा वाजवण्याची विनंती केली.
जसे देवीने वीणा वाजवण्यास सुरूवात केली तसे संसारातील सर्व जीव-जतुंना वाणी प्राप्त झाली. सृष्टीला एकप्रकारचे विशेष सौंदर्य प्राप्त झाले. तेव्हापासून ब्रह्मदेवाने त्या देवीला वाणी देवी सरस्वती असे संबोधले. सरस्वतीची भगवती, शारदा, वीणावादिनी आणि वाग्देवी यासारख्या अनेक नावांनी पुजा केली जाते. ही देवी विद्या आणि बुद्धि प्रदान करते. संगीताची उत्पत्ति केल्याने यादेवीला संगीताचीदेवी देखील म्हटले जाते. वसंत पंचमीचा दिवस हा देवीचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो.
पूजन विधी
- सकाळी स्नान करून पवित्र आचरण, वाणी संकल्पाने सरस्वतीची पूजा करा.
- पूजेमध्ये गंध, अक्षतासोबत विशेषतः पांढरे आणि पिवळे फुल, पांढरे चंदन, पांढरे वस्त्र सरस्वतीला अर्पण करावेत.
- नैवेद्यामध्ये पिवळे तांदूळ, खीर, दुध, तिळाचे लाडू, तूप, नारळ असावे.
- त्यानंतर देवी सरस्वतीची आरती करावी
सरस्वती स्तुती
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता,
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता,
सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाड्यापहा ।।1।।
शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाद्यां जगद्व्यापिनीं
वीणा-पुस्तक-धारिणीमभयदां जाड्यांधकारपहाम्।
हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां
वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्।।2।।
या मूळ मंत्राने करा देवी सरस्वतीचे पूजन, प्राप्त होतील शुभफळ
हिंदू धर्म शास्त्रानुसार प्रत्येक देवी आणि देवतांचा एक मूळ मंत्र असतो. या मंत्राने त्यांचे आवाहन केले जाते. हे मंत्र विशेष सिद्ध असतात. वेदानुसार अष्टाक्षर मंत्र देवी सरस्वतीचा मूळ मंत्र - श्रीं ह्रीं सरस्वत्यै स्वाहा हा आहे. देवी सरस्वतीची पूजा करताना तसेच नैवेद्य दाखवताना या मंत्राचा जप अवश्य करवा. सरस्वती पूजन करताना खालील श्लोकांचा उच्चार करून देवी सरस्वतीचे ध्यान करावे....
सरस्वती शुक्लवर्णां सस्मितां सुमनोहराम्।।
कोटिचंद्रप्रभामुष्टपुष्टश्रीयुक्तविग्रहाम्।
वह्निशुद्धां शुकाधानां वीणापुस्तकमधारिणीम्।।
रत्नसारेन्द्रनिर्माणनवभूषणभूषिताम्।
सुपूजितां सुरगणैब्र्रह्मविष्णुशिवादिभि:।।
वन्दे भक्तया वन्दिता च मुनीन्द्रमनुमानवै:।
(देवी भागवत 9/4/45-48)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.