आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसंत पंचमी 5 फेब्रुवारीला:सिद्धी आणि रवियोगात होणार विवाह; या दिवशी खरेदी आणि नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी स्वयंसिद्ध मुहूर्त

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावेळी 5 फेब्रुवारी रोजी सिद्धी आणि रवि योगात वसंत पंचमी साजरी होणार आहे. पंचमी तिथी या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.४५ पर्यंत राहील. या दिवशी देवी सरस्वतीचा प्रकट दिन साजरा केला जातो. या उत्सवात देवी सरस्वतीला पिवळे वस्त्र अर्पण करून पिवळ्या फुलांनी पूजन करून पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी मुलांचा विद्यारंभ संस्कारही केला जातो.

स्वयंसिद्ध मुहूर्त असल्यामुळे वसंत पंचमी महिन्यातील पहिला विवाह मुहूर्तही असेल. पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र यांच्यानुसार, या महिन्यात गुरु अस्तामुळे 22 फेब्रुवारीपर्यंत वसंत पंचमीसह केवळ 5 विवाह मुहूर्त असतील. यानंतर १७ एप्रिलपासून लग्नसराई सुरू होणार आहे.

घरात करा सरस्वती पूजन
डॉ. मिश्र सांगतात की, वसंत पंचमीला मंदिर आणि घरांमध्ये देवी सरस्वतीची पूजा करून बुद्धी आणि ज्ञानासाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी विद्यारंभ संस्कार करून अनेक मुलांचे शिक्षण सुरू केले जाते. मुलांना पहिला शब्द लिहायला शिकवला जातो. या दिवशी सरस्वती वंदना आणि उपासनेसाठी सर्वात शुभ मुहूर्त सकाळी 6.59 ते रात्री 11.30 पर्यंत असेल.

खरेदी आणि नवीन सुरुवातीसाठी चांगला दिवस
वसंतपंचमीला नवीन प्रतिष्ठान, शैक्षणिक संस्था सुरू करणे शुभ असल्याचे ज्योतिषी सांगतात. या दिवशी मुलांचे विद्यारंभ संस्कार करणेही उत्तम. गुरु ग्रहाच्या उदयामुळे या दिवशी धार्मिक आणि मांगलिक कार्य केले जाऊ शकते.

वसंत पंचमीचा दिवस विवाहासाठी शुभ मानला जातो. या सणाला विद्येची देवता सरस्वतीच्या पूजेबरोबरच गृहप्रवेश, नवीन अभ्यासक्रम सुरू करणे, अभ्यास किंवा परीक्षेची तयारी करणे, नवीन नोकरी सुरू करणे, कोणतेही नवीन काम सुरू करणे, भूमीपूजन करणे आदी शुभ कार्य करता येतात.

बातम्या आणखी आहेत...