आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तू:देवघराशी संबंधित या गोष्टींचे अवश्य करावे पालन, प्राप्त होईल सकारात्मक फळ  

3 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • देवघराची मांडणी ही चुकीची असल्यास विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते

हिंदू घरांमध्ये देवघर अवश्य असते. जर हे देवघर वास्तुशास्त्राच्या नियमात असेल तर, याचा शुभ प्रभाव आपल्या कुटुंबावर पडतो. घरातील देवघराची मांडणी ही चुकीची असल्यास त्या घरातील व्यक्तींना अनेक प्रकारच्या आर्थिक, मानसिक अशांतीचा सामना करावा लागतो. येथे देवघराशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत. या छोट्या-छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास पूजेचे श्रेष्ठ फळ प्राप्त होते आणि लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये धन-धान्याची कमतरता भासत नाही.

> देवघर दुकान किंवा घरामध्ये ईशान्य म्हणजे पूर्व-उत्तर दिशेला बनवावे.

> देवघरात देवी-देवतांच्या मूर्ती आणि फोटोची स्थापना उत्तर किंवा पूर्व दिशेला करणे शुभ राहते.

> देवघरात श्रीगणेश, कुबेर आणि देवी लक्ष्मी तसेच नवग्रहांची स्थापना अशाप्रकारे करावी की, त्यांचे मुख उत्तर दिशेकडे राहील.

> देवघरात भगवान विष्णू, शिव, श्रीकृष्ण, सूर्य आणि कार्तिकेय यांच्या स्थापना अशाप्रकारे करावी की, त्यांचे मुख पश्चिम दिशेला राहील.

> देवघरात हनुमानाची स्थापना करणे शुभ राहते. यामध्ये यांचे मुख नैऋत्य म्हणजे दक्षिण-पश्चिम दिशेला असावे.

देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात

शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेऊ नये, जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकराएवढे असावे. देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे. एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज्य सांगितले आहे. इतर देवी-देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात. जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ राहतात, परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्याच मूर्ती श्रेष्ठ मानण्यात आल्या आहेत.

देवघरापर्यंत पोहोचावा सूर्यप्रकाश

घरामध्ये देवघर अशाठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते, त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्य प्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते.

बातम्या आणखी आहेत...