आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुरुवार, 11 मार्चला शिव पूजेचा महापर्व महाशिवरात्री आहे. या दिवशी शिवलिंगाचे दर्शन आणि विशेष पूजन करण्याची प्रथा आहे. ज्या लोकांना मंदिरात जाणे शक्य नसेल त्यांनी घरातच शिवलिंग पूजन करावे. घरामध्ये शिवलिंग नसल्यास शिवरात्रीला छोटेसे पारद शिवलिंग घरी घेऊन येऊ शकता. पारद शिवलिंगाची पूजा केल्याने अक्षय्य पुण्य प्राप्त होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार पारद शिवलिंग घरामध्ये ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात. येथे जाणून घ्या पाऱ्यापासून निर्मित शिवलिंगाच्या काही खास गोष्टी...
लिंगकोटिसहस्त्रस्य यत्फलं सम्यगर्चनात्।
तत्फलं कोटिगुणितं रसलिंगार्चनाद् भवेत्।।
ब्रह्महत्या सहस्त्राणि गौहत्याया: शतानि च।
तत्क्षणद्विलयं यान्ति रसलिंगस्य दर्शनात्।।
स्पर्शनात्प्राप्यत मुक्तिरिति सत्यं शिवोदितम्।।
अर्थ - लाखो-कोटी शिवलिंगाची पूजा केल्याने जे फळ प्राप्त होते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त फळ पारद शिवलिंगाची पूजा आणि दर्शन केल्याने प्राप्त होते. पारद शिवलिंगाच्या केवळ स्पर्शाने सर्व पापातून मुक्ती मिळते.
कसे तयार होते पारद शिवलिंग
पारद शिवलिंग तयार करणे खूप अवघड काम आहे. सर्वात पहिले पारा शुद्ध केला जातो. त्यानंतर विविध औषधी मिसळून द्रवरूप पाऱ्याचे बंधन केले जाते म्हणजे ठोस बनवले जाते. या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास 6 महिने लागतात, त्यानंतर पारद शिवलिंग तयार होते.
घरामध्ये किती मोठे शिवलिंग ठेवावे
देवघरात ठेवण्यात येणाऱ्या शिवलिंगाचा आकार आपल्या अंगठ्यापेक्षा अधिक असू नये. शिवलिंग खूप संवेदनशील असते, यामुळे घरात अधिक मोठे शिवलिंग ठेवू नये. तसेच एकापेक्षा अधिक शिवलिंग ठेवणे टाळावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.