आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वटपौर्णिमा उद्या:पतीच्या दीर्घायुष्यासाठी विवाहित महिला या दिवशी करतात वडाची पूजा

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेला विवाहित स्त्रिया वटसावित्री व्रत करतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वादाच्या झाडासोबतच सत्यवान आणि सावित्रीची पूजा केली जाते. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते. त्यामुळे सुख, समृद्धी आणि सौभाग्य वाढते.

स्कंद पुराण आणि भविष्योत्तर पुराणानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला हे व्रत करण्याचा नियम आहे. सौभाग्य आणि संततीप्राप्तीसाठी महिला हे व्रत करतात. या दिवशी म्हणजे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला गंगेत स्नान करून पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात. या दिवसापासून लोक गंगेचे पाणी घेऊन अमरनाथ यात्रेसाठी निघतात.

विवाहित महिलांचे व्रत
वट पौर्णिमा व्रतामुळे महिलांना सौभाग्य मिळते. मुलांचे आणि नवऱ्याचे वय वाढते. या व्रताच्या प्रभावाने कळत- नकळत केलेली पापेही नष्ट होतात. हे व्रत ज्येष्ठ महिन्यात येते. त्यामुळे त्याचे महत्त्व अधिक आहे. हिंदू धर्मात ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला महत्त्व आहे. या दिवशी गंगेत स्नान करून पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात.

व्रताची कथा
अश्वपती या राजाची एकुलती लाडकी कन्या सावित्री उपवर झाली तेव्हा त्याने तिला पती निवडण्याचा अधिकार दिला. यावरून त्या काळात स्त्री स्वातंत्र्य आणि सन्मान होता, ही बाब लक्षात येते. सावित्रीने एका देखण्या, निर्धन, गरीब अशा सत्यवान या तरुणाची पती म्हणून निवड केली. सात्विक व विश्वासू वृत्ती असल्याने दरबारातील काही व्यक्तींनी गैरफायदा घेऊन त्यांचे राज्य गिळंकृत केले होते. सत्यवान आई-वडिलांना घेऊन रानावनात भटकत होता. विवाह ठरल्यानंतर नारद मुनींनी सावित्रीचे मन बदलण्याचा प्रयत्न केला. सत्यवान अल्पआयुष्यी आहे, एक वर्ष त्याचे आयुष्य आहे, तू लग्न करू नकोस, असे समजावले. पण ती आपल्या विचारापासून ढळली नाही.

योग्य मुहूर्तावर तिचा सत्यवानाशी विवाह झाला. बघता बघता वर्ष कधी संपले हे लक्षातही आले नाही. नेहमीप्रमाणे एके दिवशी सत्यवान लाकडे तोडण्यासाठी जंगलात निघाला. त्यावेळी सावित्रीने सोबत येण्याचा हट्ट धरला. जंगलाचे सौंदर्य ,पशुपक्ष्यांचा आवाज, नदीचा खळखळाट, फळांनी लकडलेले वृक्ष, हे सारे पाहात दुपार झाली.

समोरच सत्यवान एका झाडाची फांदी तोडता तोडता धाड्कन जमिनीवर कोसळला. यमाने आपला फास सत्यवानाच्या गळ्याभोवती आवळला. सत्यवान मृत्यू पावला. यमराज सत्यवानाचा आत्मा घेऊन निघाला तेव्हा सावित्री त्याच्यापाठोपाठ चालली. तेव्हा यम तिला म्हणाला, ‘तू मागे-मागे येऊ नकोस, तू घरी जाऊन सासू-सासर्‍याची सेवा कर’. पण सावित्री काही न बोलता ती यमाच्या पाठीमागे चालत होती. अखेर यम तिला म्हणाला, ‘हे पतिव्रते मी सत्यवानाच्या प्राणाशिवाय तुला तीन वर देतो, तू माग.’

तिच्या पतीवरच्या निस्सीम प्रेमाची यमराजालाही जाणीव होती. सावित्रीने तीन वर मागितले. प्रथम वर माझ्या सासू-सासर्‍यांची गेलेली दृष्टी परत येऊ दे. दुसरा वर त्यांचे गेलेले राज्य परत मिळू दे व तिसरा वर म्हणजे त्यांच्या मांडीवर नातवंडे खेळू दे. यमाने तथास्तू म्हणून आशीर्वाद दिला. त्याच्या लक्षात आले की, नातवंडे खेळू दे असा वर दिला आहे म्हटल्यावर सत्यवानाचे प्राण आता सावित्रीला परत देणे भाग आहे.

सत्यवानाचा प्राण परत मिळाला. तो उठून बसला. वैभव आले, वृद्ध आई-वडिलांना दृष्टी आली. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि पतीवरच्या निस्सीम प्रेमामुळे सावित्रीने आपल्या संसारात आनंद भरला. हा सगळी कथा वडाच्या झाडाखाली घडली म्हणून ज्येष्ठ शुद्ध पौणिर्मेला सुवासिनी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात. ब्राम्हणाला दान दिले जाते. असे या वटपौणिर्मेचे महत्त्व आणि त्या पाठीमागची कथा आहे.

असाध्य गोष्ट साध्य करण्याकरिता स्त्रियांच्या बाबतीत पतीनिष्ठा ही महत्त्वाची आहे. सावित्रीसारखा पतीपासून विभक्त न होण्याचा निर्धार व जीवघेण्या संकटावरही मात करण्याची तीव्र इच्छा असावी, असा मौलिक संदेश या वटपौणिर्मेनिमित्त मिळतो.

बातम्या आणखी आहेत...