आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दसरा 2020:विजयादशमीला सोनं लुटणे आणि शस्त्र पूजन करण्यामागे आहे खास कारण, तुम्हीही जाणून घ्या

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नऊरात्री अंबेचा जागर झाल्यानंतर दहावा दिवस असतो विजयादशमीचा. सोने लुटण्याचा. दस-याच्या दिवशी लोक एकत्र येतात. आपटा व शमीच्या पानांमुळे अर्जुन योग येतो. आपल्याला विजय मिळावा आणि तो जीवनात कायम राहावा यासाठी दस-याला सोने लुटले जाते. पुराणामध्ये सीमोल्लंघन, सोने लुटणे या संदर्भात विविध कथा सांगण्यात आल्या आहेत. येथे जाणून घ्या, दसर्‍याला आपटा व शमीच्या पानांना का विशेष महत्त्व आहे...

यामुळे लुटले जाते सोने
रघुराजाच्या काळची पुराण कथा आहे, वरतंतू ऋषींचा शिष्य कौत्स. चौदा विद्यामंध्ये त्याने प्रावीण्य संपादन केले. गुरूऋणातून उतराई होण्यासाठी त्याने गुरुदक्षिणेबद्दल विचारले. विद्या लोकांच्या कल्याणासाठीच उपयोगात आण हीच माझी गुरू दक्षिणा, असे गुरूने सांगितले. मात्र शिष्याने जास्तच आग्रह केला. तेव्हा गुरूंनी सांगितले की, चौदा विद्यांच्या बदल्यात चौदा कोटी सुवर्णमुद्रा दे. गुरूंना वाटले कौत्स आता गुरूदक्षिणेचा नाद सोडून देईल. कौत्स रघुराजाच्या दरबारी गेला. त्यास सगळी परिस्थिती निवेदन केली. राजाकडेही एवढे द्रव्य नव्हते म्हणून त्याने कुबेरावर स्वारी करून द्रव्य मिळवण्याचा बेत केला. रघुराजाच्या स्वारीची कुणकुण लागताच कुबेराने नगरीच्या वेशीबाहेर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. या सुवर्ण मुद्रा ज्या झाडा वर पडल्या ते झाड आपट्याचे होते. त्या घेऊन जा म्हणून कौत्साला सांगितले. १४ कोटींपेक्षा एकही जादा सुवणमुद्रा त्याने घेतली नाही. दिलेले दान कुबेरही कसा परत घेणार. शेवटी त्या सुवर्णमुद्रा नगरजनांनी लुटून न्याव्यात असा सुवर्णमध्य काढण्यात आला. तो दिवस होता विजयादशमीचा. म्हणून सीमोल्लंघन करून सोने लुटून नेले जाते.

यामुळे केली जाते शस्त्र पूजा
- षोडश मातृकामध्ये सहाव्या क्रमात जी देवी येते तिचे नाव विजया आहे. जगतजननी मत भवानीच्या दोन सखींचे (मैत्रिणी) नाव जया-विजया आहे. यामधील एकीच्या नावावर विजयादशमीचा सण साजरा केला जातो. हा सण शस्त्राने देशाच्या सीमेची रक्षा करणारे तसेच कायद्याचे रक्षण करणारे किंवा शस्त्राचा इतर चांगल्या कामासाठी वापर करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

- या दिवशी हे सर्वजण आपापल्या शस्त्रांची पूजा करतात, कारण हे शस्त्र प्राणांची रक्षा करतात तसेच भरण पोषणाचे साधनही आहेत. या अस्त्रांमध्ये विजय देवीचा वास मानून यांची पूजा केली जाते. सर्वात पहिले शस्त्रांवर पाणी शिंपडून पवित्र केले जाते त्यानंतर महाकाली स्तोत्राचे पाठ करून शस्त्रांवर हळद, कुंकू, फुल अर्पण करून धूप-दीप दाखवून पूजा केली जाते.

- त्यानंतर दलाचा प्रमुख थोडावेळ शस्त्रांचा प्रयोग करतो. अशाप्रकारे पूजा करून संध्याकाळी रावणाच्या पुतळ्याचे दहन करून विजयादशमीचा सण साजरा केला जातो.