आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्कंद पुराण आणि भविष्य पुराणात ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला उत्सव म्हटले गेले आहे. यावेळी हा उत्सव मंगळवार, 14 जून रोजी आहे. या दिवशी स्नान, दान, व्रत आणि पूजा केल्याने कळत-नकळत केलेली पापे नष्ट होतात. या दिवशी नक्षत्रांचा शुभ संयोग जुळून येत आहे. त्यामुळे या योगात केलेल्या धार्मिक कर्माचे शुभ परिणाम आणखी वाढतील. पुरीचे ज्योतिषी डॉ.गणेश मिश्र यांच्यानुसार या दिवशी शुभ, बुधादित्य आणि शश नावाचा महापुरुष योग जुळून येत आहे. त्यामुळे हा सण आणखीनच खास बनला आहे. या शुभ संयोगात तीर्थस्नान आणि दान केल्याने मिळणारे पुण्य अनेक पटींनी वाढते. या दिवशी केलेल्या शुभकार्याने मनोकामना पूर्ण होतात.
धार्मिक महत्त्व
1. भारतीय संस्कृतीत ज्येष्ठ पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. या दिवशी गंगेत स्नान करून श्रीविष्णू आणि सूर्यदेवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात.
2. या पौर्णिमेपासूनच लोक गंगाजल घेऊन अमरनाथ यात्रेसाठी निघतात. मात्र, यावेळी ही यात्रा होईल की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.
3. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला संत कबीरदास जयंती साजरी केली जाते.
4. ज्येष्ठ मासातील पौर्णिमेला पितरांची विशेष पूजा आणि ब्राह्मण भोजन दिले जाते. यामुळे पितर तृप्त होतात.
5. सौभाग्य आणि समृद्धीसाठी या दिवशी वडाच्या झाडाची पूजा आणि सावित्री व्रत केले जाते.
ज्योतिषिय महत्त्व
1. या उत्सवात सूर्य आणि चंद्रामध्ये 169 ते 180 अंशांचा फरक असतो. त्यामुळे या ग्रहांमध्ये संसप्तक योग तयार होतो.
2. या योगात केलेल्या कामामध्ये यश मिळते.
3. पौर्णिमेचा स्वामी स्वतः चंद्रदेव आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राचा प्रभाव आपल्या मनावर पडतो. त्यामुळे या तारखेला निश्चितच मानसिक उलथापालथ होते.
4. पौर्णिमेला, चंद्र त्याच्या सोळा कलांनी पूर्ण होतो. त्यामुळे या दिवशी औषधींचे सेवन केल्याने वय वाढते.
5. मंगळवार आणि पौर्णिमा तिथीपासून तयार झालेल्या शुभ संयोगात केलेल्या कामांमुळे सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.