आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उपासना:22 ऑगस्टपासून गणेशोत्सव, श्रीगणेश पूजेमध्ये सोने, चांदी किंवा तांब्याचे भांडे वापरावेत, पूजेसाठी हे धातू शुभ मानले जातात

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 22 ऑगस्टपासून गणेश उत्सव सुरु होत आहे. गणेश पूजन कर्मामध्ये विविध प्रकारच्या भांड्यांचा वापर केला जातो. विशेषतः कलश, पूजेचेत ताट, वाटी, दिवा इ. या सर्व भांड्याच्या धातू संदर्भात काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्याकडून जाणून घ्या, पूजेसाठी कोणते धातू शुभ राहतात आणि कोणत्या धातूचा पूजन कर्मामध्ये उपयोग करू नये.

सोने, चांदी, तांब्याचे भांडे राहतात शुभ
पूजन कर्मामध्ये उपयोगात येणारे भांडे सोने, चांदी, पितळ किंवा तांब्याचे असणे शुभ राहते. आपल्या सामर्थ्यानुसार या चार पैकी एक धातूचे भांडे पूजेमध्ये वापरू शकता. पूजन कर्मामध्ये या भांड्यात ठेवलेल्या पाण्यामध्ये धातूचे तत्त्व उतरतात. या पाण्याचे सेवन केल्यानेही आरोग्य लाभ होतो. आयुर्वेदानुसार विविध आजारांमध्ये स्वर्ण भस्म, रजत भस्माचा उपयोग औषधी स्वरूपात केला जातो. ठीक त्याचप्रकारे या भांड्यातील शुभ पाण्यानेही आरोग्य लाभ प्राप्त होतात.

अशुभ धातू
पूजेमध्ये लोखंड, स्टील आणि ऍल्युमिनिअम धातू वर्ज्य सांगण्यात आले आहेत. धार्मिक कार्यामध्ये लोखंड, स्टील आणि ऍल्युमिनिअम धातूला अपवित्र धातू मानण्यात आले आहे. यामुळे या धातूंच्या मूर्ती बनवल्या जात नाहीत. लोखंडाला हवा, पाण्याने गंज लागतो. पूजा करताना देवतांच्या मूर्तीला हाताने स्नान घातले जाते, अशावेळी गंज लागलेल्या गोष्टीचा आपल्या त्वचेवर वाईट प्रभाव पडतो. यामुळे अशा मूर्ती बनवल्या जात नाहीत.