आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेरक प्रसंग:मृत्यू अटळ आहे, मृत्यूनंतर कोणीही काहीच सोबत घेऊन जाऊ शकत नाही, यामुळे चुकीच्या कामापासून दूर राहावे

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन काळी एक संत गावाच्या बाहेर एका झोपडीत राहत होते. गावामध्ये आणि जवळपासच्या भागात ते संत खूप प्रसिद्ध होते. यामुळे गावाच्या बाहेर असूनही लोक त्यांच्याकडे जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी येत होते. अनेकवेळा अनोळखी लोकही त्यांचेकडे जाऊन अडचणी सांगत होते. कधीकधी काही लोक त्यांना गावामध्ये परत जाण्याचा रस्ताही विचारात होते. संत त्यांना समोरच्या दिशेकडे इशारा करून रस्ता सांगत होते. काही लोक एखादा दुसरा रस्ता नाही का असेही विचारात होते, संत सांगायचे गावामध्ये जाण्याचा हाच रस्ता आहे.

> लोक संताने सांगितलेल्या रस्त्यावरून गेल्यानंतर ते स्मशानात पोहोचत होते. त्यानंतर लोकांना संताचा खूप राग येत होता. काही लोक संताला शिव्याही देत होते. काही लोक काहीही न बोलता दुसरा रस्ता पकडत होते. एके दिवशी एका यात्रेकरूसोबत असेच झाले. त्याला संताचा खूप राग आला.

> क्रोधीत यात्री संताला बोलण्यासाठी त्यांच्याकडे आला. संताला विचारले की, मला चुकीचा रस्ता का सांगितला? त्याने संताला खूप वाईट शब्द वापरले आणि बोलता-बोलता यात्री थकून गेला आणि गप्प बसला. त्यानंतर संताने बोलणे सुरु केले.

> संत म्हणाले, का रे बाबा स्मशान वस्ती नाही का? तुम्ही लोक ज्याला वस्ती म्हणता तेथे रोज कोणाचा न कोणाचा तरी मृत्यू होतो, रोज एखादा बेघर होतो, लोकांचे येणे-जाणे सुरूच राहते. परंतु स्मशानाच्या वस्तीमध्ये एकदा जो येतो तो मग कुठेही जात नाही. हीसुद्धा एक वस्ती आहे. माझ्या दृष्टीने हीच वस्ती आहे. प्रत्येक व्यक्तीचे अंतिम स्थान हेच असून सर्वांना येथेच यायचे आहे. यामुळे आपण चुकीच्या कामांपासून दूर राहावे. या कारणांमुळे मी तुला हा रस्ता सांगितला.

> संतांच्या या गोष्टी ऐकून यात्री नतमस्तक झाला आणि आपल्या घरी निघून गेला.

कथेची शिकवण
जीवनाचे अंतिम आणि अटळ सत्य मृत्यू असून जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे. या कथेमधून संताने हाच संदेश दिला आहे की, सर्व लोकांनी अंतिम सत्य लक्षात ठेवून काम केले तरच वाईट गोष्टींपासून दूर राहिले जाऊ शकते.