आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्राचीन लोककथेनुसार एक महिला नियमितपणे मंदिरात जात असे पण एक दिवस महिलेने पुजाऱ्याला सांगितले की, मी आता मंदिरात येणार नाही. पुजाऱ्याने यामागचे कारण तीला विचारले, महिला म्हणाली- या मंदिरात येणारे सर्वजण फक्त दिखावा करतात. काहीजण तर फक्त वाईट गोष्टी करतात. त्यांना देवाच्या पुजेशी काही देणे-घेणे नसते. अशा या ढोंगी लोकांना पाहून मला खूप वाईट वाटते. त्यामुळे मला यापुढे मंदिरात येण्याची इच्छा नाही.
त्यावर पुजारी म्हणाला की, जे आपल्याला योग्य वाटते तेच करा. पण शेवटचा निर्णय घेण्यापूर्वी तूम्ही माझे एक काम कराल? महिलेने होकारार्थी मान हलवून म्हणाली, सांगा मला काय करावे लागेल?
पुजाऱ्याने त्या महिलेला एक दुधाचा ग्लास भरून दिला आणि सांगितले की, तूम्ही हा ग्लास घेऊन मंदिराच्या दोन प्रदक्षिणा पूर्ण करा पण दुधाचा एक थेंबही खाली पडता कामा नये. त्यावर महिला म्हणाली, हे तर अगदी छोटेशे काम आहे, मी लगेच करते. महिलेने मंदिराला प्रदक्षिणा मारायला सुरूवात केली. दुध सांडू नये म्हणून ती खूप काळजीपुर्वक चालत होती. तिने दोन्ही परिक्रमा पूर्ण केल्या आणि पुजाऱ्याकडे गेली. तेव्हा पुजाऱ्याने तिला विचारले की, तुम्हाला मंदिरात कोणी गप्पा करताना दिसले, किंवा आपण एखाद्या अशा व्यक्तीला बघितले जो, फक्त दिखावा करत आहे?
त्यावर महिलेने सांगितले, तिचे लक्ष तर दुधाकडे होते, त्यामुळे तिने मंदिरात काय सुरू आहे याकडे लक्ष दिलेच नाही. पुजारी हसले आणि म्हणाले, आपणही पुजा अशाच पद्धतीने केली पाहिजे. कोण काय करतंय, याकडे आपण दुर्लक्ष केले पाहिजे. फक्त आणि फक्त देवाचे ध्यान केले पाहिजे.
कथेची शिकवण
भक्ती करताना आपले संपूर्ण ध्यान देवावर असले पाहिजे. अजिबात आजूबाजूच्या गोष्टींचा विचार करू नये. तेव्हाच आपल्याला भक्तीचे फळ मिळेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.