आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उपासना:देवी-देवतांच्या मूर्ती, शंख, जानवे कधीही थेट जमिनीवर ठेवू नये, उंच स्थानावर ठेवावे

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • एखाद्याला दान करण्याचा संकल्प केला असल्यास तो वेळेवर पूर्ण करणे आवश्यक

पूजा-पाठ करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास पूजन कर्माचे फळ लवकर प्राप्त होऊ शकते. उज्जैनचे  ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, पुजेशी संबंधित काही खास गोष्टी.

> पूजा करताना दिवा, शिवलिंग, शाळीग्राम, देवतांच्या मूर्ती, यज्ञोपवीत, सोनं, शंख, मणी या वस्तू कधीही जमिनीवर ठेवू नयेत. या वस्तू जमिनीवर ठेवण्यापूर्वी एखाद्या कपड्यावर किंवा उंच स्थानवर स्थापीत कराव्यात.

> हिंदू पंचांगानुसार कोणत्याही महिन्यातील अमवस्या, पौर्णिमा, चतुर्दशी आणि अष्टमी तिथीला स्त्री संग, तेल मालिश आणि मांसाहार करू नये.

> आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आई-वडील, मुलगा, मुलगी, पतिव्रता पत्नी, श्रेष्ठ पती, गुरु, अनाथ स्त्री, बहिण, भाऊ, देवी-देवता आणि ज्ञानी लोकांचा अनादर करू नये. यांचा अनादर केल्यास व्यक्ती धनकुबेर असला तरी त्याला खजिना रिक्त (रिकामा) होतो. या लोकांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचा लक्ष्मी लगेच त्याग करते.

> जर आपण एखाद्या व्यक्तीला दान करण्याचा संकल्प केला असेल तर ठरवलेल्या दिवशी, तिथीला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा संकल्प पूर्ण करावा. दान करण्यात एक दिवसाचा उशीर झाला असेल तर दुप्पट दान करावे. एक महिना उशीर झाला असेल तर शंभरपट दान करावे. यामुळे दान वेळेवरच करावे. विनाकारण दान करण्यास उशीर करू नये.

> बाहेरून घरात येण्यापूर्वी घराच्या मुख्य दरवाजा बाहेरच दोन्ही पाय पाण्याने स्वच्छ धुवावेत. त्यानंतरच घरात प्रवेश करावा. यामुळे घराची पवित्रता कायम राहते.

बातम्या आणखी आहेत...