आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवार 1 जुलैला विशाखा नक्षत्र असल्यामुळे सिद्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे

बुधवार 1 जुलैला विशाखा नक्षत्र असल्यामुळे सिद्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. यासोबतच आज आषाढ मासातील एकादशी तिथी आहे. या दोन शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या आठ राशीचे लोक नोकरी आणि बिझनेसमध्ये भाग्यशाली राहतील. बुधवारचे ग्रह-तारे या राशीच्या फेव्हरमध्ये राहतील. या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष: शुभ रंग : आकाशी | अंक : ८

लहान मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. विरोधकांचा  जोर आता  कमी होईल. अनुकूल दिवस.

वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : १

थोडी मानसिक अस्वस्थता राहील. नोकरीत वरीष्ठांचे दडपण जाणवेल. कर्तव्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे. स्वत:साठी, कुटुंबासाठी वेळ काढणे अशक्य होईल.

मिथुन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६

आज तुमचे मनोबल उत्तम असल्याने तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. वेळीच घेतलेले योग्य निर्णय कामी येतील. आज तुमचा स्वप्नपूर्तीचा दिवस.

कर्क :  शुभ रंग : भगवा| अंक : ३
दैनंदीन कामे आज वेळच्यावेळी पार पडतील. काही भग्यवंतांची वास्तूविषयक स्वप्ने साकार होतील.

सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २

मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील.कार्यक्षेत्रात काही जुन्या चुका निस्तराव्या लागतील.

कन्या : शुभ रंग : निळा | अंक : ४

धंदेवाईक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील. स्वत:चे लाड पुरवण्यासाठी सढळ हस्ते खर्च कराल. 

तूळ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ३

अधुनिक राहणीमानाकडे तुमचा कल राहील. प्रेमप्रकरणे फुलतील, बहरतील. ज्येष्ठांस प्रकृती स्वास्थ्य लाभेल.

वृश्चिक : शुभ रंग : डाळींबी | अंक : ८

कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. काही महत्वाच्या कामानिमित्त पायपीट होईल.

धनू :  शुभ रंग : मरून | अंक : ७

पारीवारीक सदस्यांत सलोख्याचे संबंध राहतील. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील. दिवस लाभाचा.

मकर : शुभ रंग : चंदेरी | अंक : ९
 
कामाचा व्याप, अती महत्वाकांक्षा यामुळे आज काहीसे सैरभैर व्हाल. कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल.

कुंभ : शुभ रंग : राखाडी | अंक : ६

तब्येत थोडी नरमच राहील. विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. सत्संगाकडे वळाल.

मीन : शुभ रंग : मोरपीशी | अंक : ५ 

कष्टांचाही अतिरेक करू नका. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे लक्षात ठेवा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटकून टाकलेल्या बऱ्या.

बातम्या आणखी आहेत...