आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार 

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 22 जुलै रोजी आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. या राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम होऊ शकते. सेव्हिंगही वाढेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. 

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष: शुभ रंग : पांढरा | अंक : ८
आर्थिक सुबत्ता नांदेल. रिकाम्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य देऊन कार्यक्षेत्रात अग्रेसर राहता येईल.

वृषभ: शुभ रंग : मोतिया | अंक : ५
व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागेल. काही तत्त्वे गुंडाळून ठेवावी लागतील. आज काही अती हुशार मंडळी संपर्कात येतील. डोके शांत ठेवण्याची गरज.

मिथुन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ७
व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. शेजारी कुत्सित नजरेने बघतील. आज वादविवादात शब्दांवर ताबा असलेला बरा.

कर्क : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९
एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यावासायिक नवे करार यशस्वी.

सिंह : शुभ रंग : लाल| अंक : ६
आज कर्तव्यापेक्षा मौजमजेस प्राधान्य द्याल.चंगळवादी वृत्ती राहील. खर्चावर ताबा राहणार नाही.

कन्या : शुभ रंग : आकाशी| अंक : ७
अती धावपळ टाळा. आज हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करणे हिताचे राहील. आज मित्र मोलाचे सल्ले देतील.

तूळ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ८
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने आज प्रत्येक कामात उत्साह राहील. सकारात्मकता वाढेल.

वृश्चिक : शुभ रंग : जांभळा | अंक : ५
उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. नोकरदारांना साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. देव नवसास पावेल.

धनू : शुभ रंग : भगवा | अंक : ३
मनाविरुद्ध क्षुल्लक गोष्टींनीही राग अनावर होईल.महत्त्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.

मकर : शुभ रंग : राखाडी | अंक : १
मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल. पत्नीच्या लहरी सांभाळाल.

कुंभ : शुभ रंग : मरून | अंक : ४
आज काही नकारात्मक विचार मनात येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. व्यसने टाळा.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : २
नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान-मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. विरोधकांचा जोर आता कमी होईल.