आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रीती नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे बुधवारची सुरुवात

बुधवार 8 जुलै रोजी धनिष्ठा नक्षत्र असल्यामुळे प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर चार राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष: शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६

कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. मोठया लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. उपवरांंना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. इच्छापूर्तीचा दिवस.

वृषभ: शुभ रंग : सोनेरी | अंक : ३

आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल. दानधर्म करताना स्वत:ची शिल्लक बघायला हवी.

मिथुन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १

आज तुम्ही फक्त स्वत:चा विचार करा. वादविवादात फक्त ऐकण्याचे काम करा. मोफत सल्लेवाटप नको.

कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : २

व्यवसायात उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तयारी ठेवावी लागेल. उत्पादनांचा दर्जा वाढवावा लागेल. प्रामाणिक प्रयत्नांस यश निश्चित.

सिंह : शुभ रंग : अबोली | अंक : ५

नोकरदार वरीष्ठांचे मूड सांभाळतील. अधिकारी वर्गास कामगारांच्या प्रश्नांत लक्ष घालावे लागणार आहे.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३

वैवाहीक जिवनांत असलेले किरकोळ मतभेद आज सामंजस्याने मिटू शकणार आहेत. आनंदी दिवस.

तूळ : शुभ रंग : केशरी | अंक : ४

हौसमौज करताना मर्यादांचे उल्लंघन करू नका. चूकीच्या वर्तनाने प्रतिष्ठेची हानी होऊ शकेल.

वृश्चिक : शुभ रंग : पिवळा | अंक : ६

हौशी मंडळींना आज जिवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. ज्येष्ठांना उत्तम प्रकृती स्वास्थ लाभेल.

धनू : शुभ रंग : आकाशी| अंक : ८

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.

मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५

आज घराबाहेर रागिट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अती स्पष्ट बोलण्याने इतरांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे.

कुंभ : शुभ रंग : तांबडा| अंक : ९

पैशाची कमतरता जाणवणार नाही. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचाही प्रभाव पडेल.

मीन : शुभ रंग : भगवा | अंक : ७

अथक परिश्रमांच्या सहाय्याने प्रगतीची चक्रे गतीमान ठेवता येतील. काही महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार आहे. 

0