आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्राद्धाविषयी ग्रंथ काय सांगतात:पितरांसाठी वर्षात 96 दिवस असतात, मुलगा किंवा भाऊ नसेल तर पत्नी देखील करू शकते श्राद्ध

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पितरांच्या पूजेसाठी विविध प्रकारचे नियम आणि अधिकार ग्रंथांमध्ये सांगितले आहेत. यामध्ये वर्षभरात श्राद्धासाठी किती दिवस असतात, कोण कोणाचे श्राद्ध करू शकतो हे सांगितले आहे. यासोबत पितृपक्षात श्राद्ध करता येत नसेल तर पितर संतुष्ट होण्यासाठी काय करावे, असाही उल्लेख आहे. गयाच्या विष्णुपद मंदिराचे पुजारी पं. गोकुळ दुबे आणि पुरीचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्र यांच्याकडून जाणून घेऊ श्राद्धाच्या या प्रश्नांची उत्तरे...

श्राद्धासाठी कोणते दिवस सांगण्यात आले आहेत, याबाबत पं. दुबे सांगतात की, शास्त्रात पितरांच्या पूजेसाठी वेगवेगळ्या सुविधा दिल्या आहेत. रोज श्राद्ध करण्याचा नियम शास्त्रात सांगितला आहे. यामध्ये 1 दिवसापासून ते संपूर्ण वर्ष म्हणजे 365 दिवस श्राद्धाची व्यवस्था आहे. जे रोज श्राद्ध करतात त्यांच्यासाठी नित्य श्राद्ध करण्याचा नियम आहे. परंतु वेळेअभावी त्यांना रोज श्राद्ध करता येत नसेल तर 12 अमावस्या, 12 संक्रांती, पितृपक्षाचे 16 दिवससहित वर्षात 96 दिवस सांगण्यात आले आहेत. ज्यामध्ये श्राद्ध करता येते. या दिवसांत श्राद्ध केले नाही तर पितृपक्षाच्या 16 दिवसांत श्राद्ध करता येते. 16 दिवसही शक्य नसेल तर सर्वपित्री अमावस्या या एकाच दिवशी श्राद्ध केल्यास पितरांची तृप्ती होते.

श्राद्ध करता येत नसेल तर सूर्याला अर्घ्य द्यावे
डॉ. गणेश मिश्र सांगतात, जर पितृपक्षात श्राद्ध करता येत नसेल तर गीतेच्या सातव्या अध्यायाचे पठण करा. तसेच रोज सकाळी उगवत्या सूर्यासमोर पाणी आणि अन्न घेऊन प्रार्थना करावी की: "हे सूर्यदेव, यमराज हा तुझा पुत्र आहे, आमच्या घरातून निघून गेलेल्यांच्या आत्म्याला शांती लाभो. सूर्याला प्रार्थना करा की गीता पठणाचे फळ पितरांना मिळावे.

कोण कोणासाठी श्राद्ध करू शकतो? याविषयी पं. दुबे यांनी सांगितले...
1.
गौतम धर्मसूत्र सांगतो की, जर मुलगा नसेल तर भाऊ आणि पुतणे, आईच्या कुटुंबातील लोक म्हणजे मामा किंवा मामेभाऊ किंवा शिष्य श्राद्ध करू शकतात. यापैकी कोणीही नसेल तर कुळपुरोहित किंवा आचार्य श्राद्ध करू शकतात.
2. जर कुटुंबातील किंवा कुळातील कोणीही सदस्य नसेल तर त्यांचे श्राद्ध कुळपुरोहित किंवा आचार्य करू शकतात.
3. वडिलांसाठी मुलाने पिंडदान व जल-तर्पण करावे, मुलगा नसेल तर पत्नी आणि पत्नी नसेल तर सख्खा भाऊही श्राद्ध करू शकतो.
4. विष्णु पुराणात असे म्हटले आहे की, मृत व्यक्तीचे पुत्र, नातू, भावाचे अपत्य पिंडदान करण्याचे अधिकारी असतात.
5. मार्कंडेय पुराणात असे म्हटले आहे की, जर एखाद्या व्यक्तीला मुलगा नसेल तर त्याच्या मुलीचा मुलगा देखील
पिंडदान करू शकतो. तसे नसल्यास पत्नी मंत्रांशिवाय श्राद्ध करू शकते. जर पत्नी नसेल तर कुटुंबातील कोणतीही व्यक्ती श्राद्ध करू शकते.
6. आई-वडील अविवाहित मुलीचे पिंडदान करू शकतात. विवाहित मुलीच्या कुटुंबात श्राद्ध करण्यासाठी कोणी नसेल तर वडील पिंडदान करू शकतात.
7. मुलीचा मुलगा आणि आजोबा एकमेकांचे पिंडदान करू शकतात. तसेच जावई आणि सासरे देखील एकमेकांसाठी करू शकतात. सूनही सासूचे पिंडदान करू शकते.

बातम्या आणखी आहेत...