आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्री:कालीघाट मंदिरातील देवी कालीची पूजा दुर्गेच्या रूपात! देशातील सर्वात मोठे कालीचे मंदिर

कोलकाता / साेमा नंदी5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकात्यामध्ये एेतिहासिक कालीघाट काली मंदिर आहे. येथे नवरात्रीनिमित्त कालीची दुर्गेच्या रूपाने आराधना केली जाते. येथे दुर्गा देवीची स्वतंत्र मूर्ती नाही. नवरात्रीच्या स्वागताची बाेधन पूजा ३० सप्टेंबरला झाली आहे. षष्ठीच्या दिवसापर्यंत गर्भगृहात स्थापित मूर्तीला दरराेज तांदूळ, केळी, साखर, मिठाई, फूल व जलाचा भाेग असताे.

सप्तमीच्या सकाळी केळीच्या पानांना मूर्तीच्या शेेजारी ठेवले जाते. केळीच्या पानांना गणेशाची पत्नी रूपाने पूजा केली जाते. याप्रसंगी दीप प्रज्वलन करताना खूप दक्षता बाळगली जाते. अनुष्ठानानुसार दिवे लावले जातात. तेव्हा त्याची दक्षता घेतली जाते. सध्या गऊ बाजार येथील या मंदिरात भाविकांची गर्दी वाढलीय. काेविडच्या नियमानुसार ८० टक्के भाविक परतले आहेत. म्हणूनच आम्ही चांगल्या बदलाची अपेक्षा करताे, असे व्यवस्थापनातील सदस्य संदीप हलदर यांनी सांगितले. तीन तास चालणारी ही पूजा सप्तमी, अष्टमी व नवमीच्या रात्री दाेन वाजता हाेते. संधिपूजा यंदा अष्टमी व नवमीच्या संधिकाली हाेणार आहे. यंदा रात्री ११.२५ ते दुपारी १२.१३ पर्यंत पूजा आयाेजित केली जाईल. सप्तमीला शाकंभरीचे रूप दिले जाते. त्यात मातेला सुपारी, आवळा, बेल, साडीचा शृंगार करून भगवान गणेशाजवळ विराजित केले जाते. अष्टमी व नवमी दरम्यान संधिपूजा केली जाते. त्याला चामुंडा पूजा म्हटले जाते. नवमी पूजेनंतर मंदिरात अनुष्ठानाच्या रूपात बळी दिला जाईल.

अखेरच्या दिवशी शिजवलेला भात, भाज प्रसादाच्या रूपाने दिली जाईल. राधा-कृष्णाच्या मूर्तीला देखील मंदिरात आणले जाईल. त्यांची विशेष पूजा हाेते. दुपारी भाेगाच्या रूपाने पिवळे तांदूळ अर्पण केले जातात. त्यानंतर गर्भगृहात ठेवलेल्या केळीच्या पानांना विसर्जित केले जाते. त्यानंतर पूजेचा समाराेप आरतीने हाेताे. दिवे प्रज्वलीत करून ते पुजाऱ्यांच्या घरी नेले जातात. दशमीच्या दिवशी दुपारी १ वाजेपासून सुरू हाेणाऱ्या दुसऱ्या भागात काेणत्याही पुरुष भक्ताला गर्भगृहाच्या आता प्रवेश दिला जात नाही. कालीघाट काली मंदिरातील स्थापित काली मूर्ती अद्वितीय आहे. ते ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे. हिंदू धर्मात त्यास पवित्र मानले जाते. कालीघाटावर सतीच्या उजव्या पायाची बाेटी पडली हाेती, अशी आख्यायिका आहे. संत आत्माराम ब्रह्मचारी, ब्रह्मानंद गिरीद्वारे निर्मित टचस्टाेनच्या मूर्तीमध्ये तीन विशाल डाेळे आहेत आणि एक लांब जीभ आहे.

बातम्या आणखी आहेत...